AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asim Muneer : पाकिस्तानचा जिहादी आर्मी चीफ आसिम मुनीरचे भारताबद्दल विषारी शब्द, आता बोलतो…

Asim Muneer : पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्कर प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. इतका मार खाऊनही त्याने भारताबद्दल विषारी शब्द प्रयोग केला आहे. हरल्यानंतर स्वत:ला फिल्ड मार्शल पदवी लावून घेणारा आसिम मुनीर हा पहिलाच लष्करप्रमुख असावा. भारताने पाकिस्तानची जलकोंडी केली आहे, त्यावरही तो बोलला.

Asim Muneer : पाकिस्तानचा जिहादी आर्मी चीफ आसिम मुनीरचे भारताबद्दल विषारी शब्द, आता बोलतो...
Asim Muneer
| Updated on: May 31, 2025 | 9:13 AM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जी सैन्य कारवाई केली, त्याने पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिली. 7 ते 10 मे या चार दिवसाच्या लढाईत पाकिस्तानने भारताकडून जबर मार खाल्ला. पाकिस्तानची सैन्य प्रतिष्ठा धुळीस मिळाली. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानला अक्कल आलेली नाही. पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्कर प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. इस्लामाबाद दक्षिण आशियामध्ये भारताचा वर्चस्व कधीच मान्य करणार नाही, असं आसिन मुनीरने म्हटलं आहे. हरल्यानंतर स्वत:ला फिल्ड मार्शल पदवी लावून घेणारा आसिम मुनीर हा पहिलाच लष्करप्रमुख असावा. भारताने सिंधू जल करार स्थगित करुन पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. भारताने केलेल्या या वॉटर स्ट्राइकचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

पाकिस्तानची जलकोंडी सुरु झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून पुन्हा आक्रमक भाषा सुरु झालीय. “पाकिस्तान सिंधू जल कराराच्या मुद्यावर कधीच तडजोड करणार नाही. कारण हा विषय थेट देशातील 24 कोटी नागरिकांच्या अधिकाराचा विषय आहे” असं आसिम मुनीर म्हणाला. पाकिस्तानी सैन्याची मीडिया विंग विंग इंटर सर्विसेज पब्लिक रिलेशंस (ISPR) नुसार, आसिम मुनीरने ही टिप्पणी विविध विश्वविद्यालयाचे कुलपती, मुख्याध्यापक, वरिष्ठ शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांसोबत चर्चा करताना केली.

‘पाण्याच्या विषयावर कधीच झुकणार नाही’

सिंधू जल करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आसिम मुनीरने ही पाकिस्तानसाठी लक्ष्मण रेखा असल्याच म्हटलं. इस्लामाबाद पाण्याच्या विषयावर कधीच झुकणार नाही, असही मुनीर म्हणाला. “पाणी पाकिस्तानची रेड लाइन आहे. आम्ही 24 कोटी पाकिस्तानींच्या या मौलिक अधिकारावर कोणतीही तडजोड करणार नाही” हे आसिम मुनीरचे शब्द आहेत. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी 26 भारतीय पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर पुढच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1960 साली हा करार झाला होता. सिंधू जल करार सहा नद्या सिंधु, झेलम, चिनाब, रावी, ब्यास आणि सतलुजवर आधारित आहे. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने वारंवार इशारे दिले. पण भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.