AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाचवेळी भारताच्या 80 विमानांनी…पाकिस्तानची मोठी कबुली, त्याचवेळी भीक मागण्याची नवीन पद्धत VIDEO

Operation Sindoor : "भारत 80 विमानांसोबत आला होता. त्यात 400 मिसाइल्स होती. काही मिसाइल अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम होती. तुम्ही पाहिलं असेल, आमच्यासोबत काय झालं?. आमच्याकडे एअर डिफेन्स सिस्टिम नसतील, आम्ही ढिगाऱ्याखाली दबलो गेलो असतो"

एकाचवेळी भारताच्या 80 विमानांनी...पाकिस्तानची मोठी कबुली, त्याचवेळी भीक मागण्याची नवीन पद्धत VIDEO
Operation Sindoor
| Updated on: Jun 09, 2025 | 2:21 PM
Share

ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये सैन्य कारवाई करताना 9 दहशतवादी तळ उडवून दिले. त्यानंतर पाकिस्तानी हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना त्यांचे 11 एअरबेस उडवले. भारताचा एअर डिफेन्स आणि सैन्य पराक्रमासमोर पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. पाकिस्तान या मानहानीकारक पराभवानंतर नवीन शस्त्रांसाठी अमेरिकेला विनवण्या करत आहे.

पाकिस्तानच्या 13 सदस्यीय प्रतिनिधिमंडळाने वॉशिंग्टनमध्ये सार्वजनिकरित्या अत्याधुनिक अमेरिकी शस्त्रांची मागणी केली आहे. पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री मुसादिक मलिक यांनी अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टिम आणि फायटर विमानांची मागणी केली आहे. आम्ही तुमच्याकडून ही शस्त्र खरेदी करु असं पाकिस्तानने म्हटलं आहे. पाकिस्तानातील शहबाज आणि मुनीर सरकार आपली सरशी झाल्याची दवंडी पिटत आहेत. पण हा कबूलनामा पाकिस्तानची पोल-खोल करण्यासाठी पुरेसा आहे.

त्यात 400 मिसाइल्स होती

“भारत 80 विमानांसोबत आला होता. त्यात 400 मिसाइल्स होती. काही मिसाइल अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम होती. तुम्ही पाहिलं असेल, आमच्यासोबत काय झालं?. आमच्याकडे एअर डिफेन्स सिस्टिम नसती, तर आम्ही ढिगाऱ्याखाली दबलो गेलो असतो. भारताने जी टेक्नोलॉजी वापरली ती खूप Advance आहे. म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतोय की, टेक्नोलॉजी आम्हाला द्या, आम्ही विकत घेऊ” असं पाकिस्तानी मंत्री मलिक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत बोलताना दिसतायत.

भारताची नक्कल केली

मलिक पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाचा भाग आहेत. सध्या ते अमेरिकेत अधिकारी आणि खासदारांशी बोलत आहेत. पाकिस्तानने सुद्धा भारताची नक्कल करताना बिलावल भुट्टोच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर पाठवलं आहे.

मलिक यांचं वक्तव्य शहबाज शरीफ यांच्या उलट

पाकिस्तानी मंत्री मलिक यांचं हे वक्तव्य पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या देशांतर्गत वक्तव्याच्या बिलकुल उलट आहे. मलिक मदत मागत आहेत. शरीफ पाकिस्तानी जनतेला भारताविरुद्धच्या संघर्षात आपण कसे वरचढ ठरलो, हे खोट सांगत आहेत. पाकिस्तानने त्यापुढे एक पाऊल टाकत हरल्यानंतर लष्कर प्रमुख असीम मुनीरला फील्ड मार्शल पदावर प्रमोट केलय.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी