भारताचा खरा मित्र असलेल्या देशाच्या पंतप्रधानांच अपहरण करा, पाकिस्तानची डिवचणारी मागणी, जगात प्रचंड खळबळ..
भारत आणि पाकिस्तानचे संबंध तणावात आहेत. मात्र, यादरम्यान पाकड्यांची अमेरिकेसोबत जवळीकता वाढवली आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या मागणीमुळे जगात खळबळ उडाली आहे.

अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. त्यानंतर पहिल्यांदाच अमेरिका आणि भारतातील संबंध तणावात असल्याचे बघायला मिळाले. यादरम्यान पाकिस्तानने अमेरिकेसोबत जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला. हेच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या बाजूने करण्यासाठी पाकिस्तानात मोठी गुंतवणूक करण्याच ऑफर दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनीही पाकिस्तानात मोठा पैसा लावला. भारताविरोधात अमेरिकेला भडकवण्याचे काम करताना गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान दिसत आहे. भारताविरोधात अनेकदा आग ओकताना पाकिस्तान दिसतो. मात्र, भारतानेही पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मागील काही दिवसांपासून सळो की पळो करून सोडले. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नुकताच एक धक्कादायक विधान केले.
ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. ख्वाजा आसिफ यांनी हे विधान इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याबद्दल केले. आसिफ यांनी थेट नेतन्याहू यांचे अपहरण करावे असे म्हटले. जियो न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, नेतन्याहू हे सर्वात मोठे अपराधी आहेत. अमेरिकेने त्यांचे अपरहण केले पाहिजे आणि अमेरिकेत नेऊन त्यांच्यावर खटला चालवला पाहिजे. जर खरोखरच अमेरिकेला मानवतेचे काही पडले असेल तर अमेरिका हेच करेल.
यादरम्यान खाव्जा यांनी थेट निकोलस मादुरो यांचेही उदाहरण दिले. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने ज्याप्रकारे मादुरो यांच्यावर कारवाई केली, तशीच कारवाई नेतन्याहू याच्याही विरोधात करायला हवी. जे लोक नेतन्याहूचे समर्थन करत आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. ख्वाजा यांचा इशारा अमेरिकेसह रशियाला होता. ख्वाजा यांचे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. संपूर्ण जग मादुरो यांच्यावर झालेली कारवाई चुकीचे असल्याचे सांगताना दिसत असताना पाकिस्तानच्या रक्षा मंत्र्यांनी हे विधान केले.
यावर ख्वाजा यांना थांबत पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर यांनी थेट म्हटले की, ख्वाजा तुम्ही पाकिस्तानचे रक्षा मंत्री आहेत. लोकांना तुमचे बोलणे ऐकून वाटले की, तुम्ही डोनाल्ड ट्रम्पबद्दल बोलतआहात. त्यानंतर त्यांनी लगेचच म्हटले की, आपण ब्रेक घेऊयात..आता ही मुलाखत प्रचंड चर्चेत असल्याचे बघायला मिळत आहे. नेतन्याहू यांच्याबद्दल धक्कादायक आणि हैराण करणारे विधान ख्वाजा यांनी केले.
