पाकिस्तानात खळबळ! आणीबाणीनंतर आता नवा धक्कादायक निर्णय, माजी मुख्यमंत्र्याला…लष्कराच्या डोक्यात शिजतोय मोठा कट?
खैबर पख्तूनख्वा या प्रांतावर पीटीआय पक्षाची सत्ता होती. या पक्षाचे प्रमुख तथा माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. राष्ट्रपतींच्या आदेसानंतर आता या पक्षाचे सरकार बरखास्त झाले आहे. त्यानंतर आता पीटीआय पक्षाच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्याची मोहीम हाती घेण्यात आलीय.

Pakistan Emergency : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा या प्रांतात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांच्या आदेशानुसार या प्रांतातील सरकार बरखास्त करण्यात आले आहे. दरम्यान सरकार बरखास्त केल्यानंतर आता तेथे पाकिस्तानी लष्कर सक्रीय झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या प्रांताचे माजी मुख्यमंत्री सोहेल आफरिदी तसेच पीटीआय पक्षाच्या अन्य सात नेत्यांना ताब्यात घेण्यात आलंय. खैबर पख्तुनख्वा या प्रांतातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे, असे सांगत राष्ट्रपीत जरदारी यांनी रविवारी (11 ऑक्टोबर) या प्रांतात आणीबाणी लागू केली होती.
पीटीआयची सत्ता असलेल्या भागात आणीबाणी
खैबर पख्तूनख्वा या प्रांतावर पीटीआय पक्षाची सत्ता होती. या पक्षाचे प्रमुख तथा माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. राष्ट्रपतींच्या आदेसानंतर आता या पक्षाचे सरकार बरखास्त झाले आहे. त्यानंतर आता पीटीआय पक्षाच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्याची मोहीम हाती घेण्यात आलीय. गेल्या अनेक दिवसांपासून इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका करा, अशी मागणी पीटीआयकूडन केली जातेय. याच मागणीला घेऊन पीटीआयतर्फे खैबर पख्तुनख्वा या भागात आंदोलन केले जाणार होते. हे आंदोलन होण्याआधीच तेथील प्रांतीय सरकार बरखास्त करण्यात आले.
मुनीर दहशतवाद्यांची मदत घेत आहेत
दरम्यान, माजी मुख्यमंत्र्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता खैबर पख्तूनख्वा येथे संताप व्यक्तक केला जातोय. इम्रान खान यांचे पुत्र कासीम खान यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख आसीम मुनीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खैबर पख्तूनख्वा या भागात चालू असलेली लष्करी कारवाई योग्य असल्याचे सांगताना मुनीर हे दहशतवाद्यांची मदत घेत आहेत, असा मोठा दावा कासीम खान यांनी केलाय. तसेच खैबर पख्तूनख्वा या भागात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचाही त्यांनी निषेध केला.
प्रकरण थेट न्यायालयात
दरम्यान, राष्ट्रपतींनी घेतलेल्या या निर्णयाला पेशावर येथील उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दाखल याचिकेत राष्ट्रपती आसिफ अली जरदारी, पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि खैबर पख्तूनख्वा प्रांताचे राज्यपाल फैसल करीम कुंडी यांना प्रतिवादी बनवण्यात आलंय. त्यामुळे न्यायालय नेमका काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
