भारताचा दुष्मन आसीम मुनीरला मिळाली राक्षसी ताकद, पाकिस्तानात झाला सर्वात मोठा निर्णय!
पाकिस्तानी सेना प्रमुख आसीम मुनीर याला आता अमर्याद शक्ती मिळणार आहे. शाहबाज शरीफ यांचे सरकार त्यासाठी थेट संविधानात दुरुस्ती करणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्करात मोठे बदल होत आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार आर्मी चिफ आसीम मुनीर याला जास्तीत जास्त ताकद कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता शाहबाज शरीफ यांच्या सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. या एका निर्णयामुळे आसीम मुनीर याला अमर्याद शक्ती मिळणार आहे. विशेष म्हणजे मुनीरची ताकद वाढावी यासाठी थेट पाकिस्तानी संविधानात दुरुस्ती करण्यात येत आहे. या दुरूस्तीनुसार आता सेना प्रमुख आणि फिल्ड मार्शल या पदांना संवैदानिक दर्जा देण्याचा निर्णय पाकिस्तानमध्ये घेण्यात आला आहे.
संविधानात दुरुस्ती होणार, आसीम मुनीरची ताकद वाढणार
पाकिस्तानचे विधी व न्या विभागाच्या राज्यमंत्र्यांनीच याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तानी संविधानातील दुरुस्तीनंतर आसीम मुनीर याचे पद संवैधानिक होणार आहे. पाकिस्तानात सध्या राष्ट्रपती हे पद संवैधानिक आहे. तरे सेना प्रमुख हे पद कार्यकारी आणि प्रशासनिक आहे. हेच पद संवैधानिक व्हावे यासाठी शनिवारी (10 नोव्हेंबर) पाकिस्तानी संसदेत 27 वे संविधान दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आले. या संविधान दुरुस्ती विधेयकामुळे आसीम मुनीर याची ताकद चांगलीच वाढणार आहे. सोबतच सेना प्रमुख हे पाकिस्तानातील तिन्ही दलाचे प्रमुख असतील. सेना प्रमुख या पदावर बसणाऱ्या व्यक्तीला वायूदल, लष्कर, नौदलाला कोणताही आदेश देता देईल. संविधानाच्या 27 व्या दुरुस्तीत चीफ ऑफ डिफेन्स फोर्स या नव्या पदाची निर्मिती केली जाईल.
आसीम मुनीर याला नेमकी कोणती ताकद मिळणार?
संविधान दुरुस्तीतील मसुद्यानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती आसीफ अली झरदारी यांच्या नेतृत्त्वात हे बदल केले जाणार आहेत. या बदलांमध्ये आसीम मुनीर याला अनेक अधिकार मिळणार आहेत. 27 व्या संविधान दुरुस्ती विधेयकानुसार पाकिस्तानी संविधानातील 243 व्या कलमामध्ये दुरुस्ती केली जाईल. या दुरुस्तीअंतर्गत सेना प्रमुखांना चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस हे पद दिले जाईल. चिफ ऑफ डिफेन्स फोर्सेस पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीला नॅशनल स्ट्रॅटेजिक कमांडच्या प्रमुखाची निवड करता येईल.
दरम्यान, पाकिस्तानी सरकारच्या या निर्णयामुळे आता पाकिस्तानी लष्करात मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात नेमकं काय-काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
