AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानने केले थेट भारताचे तोंडभरून काैतुक, भारताकडे बघा म्हणत थेट..

Pakistan Praise India : इराण आणि अमेरिका युद्धाचा जगाला फटका बसत आहे. पाकिस्तानसारख्या देशामध्ये तर लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामध्येच आता थेट पाकिस्तानने भारताचे तोंडभरून काैतुक केले. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन लागण्याची स्थिती आहे.

पाकिस्तानने केले थेट भारताचे तोंडभरून काैतुक, भारताकडे बघा म्हणत थेट..
Pakistan Petroleum Minister Ali Pervez Malik
| Updated on: May 01, 2026 | 10:11 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. पाकिस्तानची वाट लागली आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. होर्मुज खाडी बंद आहे. कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे पण भारताने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा निर्णय घेतला. होर्मुज खाडी आता दोन महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून ठप्प आहे. कच्च्या तेलाचे जहाज ये जा करू शकत नाहीत. ऊर्जेचे मोठे संकट उभे आहे. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनही स्थिती आहे. कच्च्या तेलाचा साठा त्यांचा जवळपास संपला आहे. यादरम्यान भारतातील परिस्थिती आणि पाकिस्तानातील परिस्थिती बघून चक्क पाकिस्तानच्या मंत्र्याने भारताचे काैतुक केले. होर्मुज खाडीतील परिस्थितीमध्येही भारत किती जास्त मजबूत स्थितीत आहे म्हणत त्यांनी भारताचे काैतुक केले.

पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री, अली परवेझ मलिक यांनी भारताचे काैतुक केले. भारताबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, चांगल्या प्रमाणात तेल आणि डॉलरच्या साठ्यांमुळे नवी दिल्लीवर संकटाचा फार काही परिणाम दिसत नाहीये. विशेष म्हणजे त्यांचे हे विधान अशावेळी आले, त्यावेळी पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. शिवाय पाकिस्तानमध्ये महागाईने देखील मोठा कहर केला.

सध्याच्या परिस्थितीमुळे शहबाज शरीफ यांचे सरकारही प्रचंड दबावाखाली आहे. पाकिस्तान सरकारकडून अनेक प्रयत्न ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केले जात आहेत. मात्र, संकट अधिक वाढत आहे. पाकिस्तानची पूर्णपणे वाट लागली. खाण्यापिण्याचेही वांदे आहेत. मात्र, आपल्या देशातील परिस्थिती नियंत्रणात आणायची सोडून पाकिस्तान मात्र इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्यात अधिक बिझी आहे.

भारतातही या युद्धचा परिणाम दिसत आहे. भारतात एलपीजी गॅसचे संकट आहे. तुटवडा निर्माण झाला. मात्र, यातून सरकार मार्ग काढत आहे. पाकिस्तानसह बांगलादेशाची वाट लागली आहे. भारताने या वाईट काळात बांगलादेशाची मदत केली. पाकिस्तानच्या मदतीकरिता एकदी देश पुढे येत नाही. विशेष म्हणजे होर्मुज खाडी बंद असतानाही भारतात कच्चे तेल आणि एलपीजी गॅस दाखल होत आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!