पाकिस्तानी नागरिकांना अमेरिकेत ‘नो एन्ट्री’ करण्यापूर्वी ट्रम्पचा मोठा धक्का, पाकिस्तान धोकादायक देशांच्या यादीत
Pakistan Dangerous Country: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानसंदर्भात कठोर निर्णय घेत आहेत. सुरक्षेच्या कारणावरुन ट्रम्प अमेरिकेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांना नो एन्ट्री करणार आहेत. त्यासंदर्भातील बातम्या आल्या असताना ट्रम्प यांनी मोठा झटका पाकिस्तानला दिला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला धोकादायक देशाच्या यादीत टाकले आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तानात जावू नये, अशा मार्गदर्शक सूचना ट्रम्प प्रशासनाने जारी केल्या […]

Pakistan Dangerous Country: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानसंदर्भात कठोर निर्णय घेत आहेत. सुरक्षेच्या कारणावरुन ट्रम्प अमेरिकेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांना नो एन्ट्री करणार आहेत. त्यासंदर्भातील बातम्या आल्या असताना ट्रम्प यांनी मोठा झटका पाकिस्तानला दिला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला धोकादायक देशाच्या यादीत टाकले आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी पाकिस्तानात जावू नये, अशा मार्गदर्शक सूचना ट्रम्प प्रशासनाने जारी केल्या आहेत.
काय आहे ट्रम्प प्रशासनाचे दिशानिर्देश
दहशतवाद आणि सशस्त्र संघर्षाच्या संभाव्यतेमुळे पाकिस्तान हा देश सुरक्षेसाठी धोकादायक आहे. यामुळे अमेरिकन नागरिकांना पाकिस्तान प्रवासावर पुनर्विचार करण्याचे आवाहन ट्रम्प प्रशासनाने केले आहे. एका निवेदनात म्हटले आहे की, यूएस स्टेट डिपार्टमेंटने इशारा दिला आहे की अतिरेकी गट विशेषतः बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात हल्ल्याची योजना आखत आहेत. अतिरेकी अगदी कमी किंवा मोठ्या प्रमाणावर हल्ले करू शकतात. वाहतूक केंद्रे, शॉपिंग मॉल्स, लष्करी प्रतिष्ठाने, विमानतळ, विद्यापीठे आणि प्रार्थनास्थळे या ठिकाणांना अतिरेकी आपले लक्ष्य करू शकतात. पाकिस्तानात कार्यकरत असलेल्या अमेरिकन कर्मचाऱ्यांनाही मोठ्या सभांना जावू नये, असे निर्देश दिले आहे.
इस्लामाबादसारख्या प्रमुख शहरांसाठीही धोक्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानमधील सुरक्षेची परिस्थिती अस्थिर आहे. यामुळे अमेरिकन नागरिकांना पाकिस्तानमध्ये प्रवास करण्याबाबत पुनर्विचार करण्यास सांगण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात एक अध्यादेश काढणार आहे. त्या अध्यादेशात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्याचा निर्णय असेल, अशी वृत्त ‘रायटर’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
ऑस्ट्रेलियातील या अहवालानुसार पाकिस्तान धोकादायकच
दरम्यान, ऑस्ट्रेलियातील इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसने एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार जागतिक निर्देशांकात पाकिस्तानमधील दहशतवाद हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा असल्याचे म्हटले आहे. जगातील 99.7 टक्के लोकसंख्येचा समावेश असलेल्या 163 देशांचे सर्वेक्षण केल्यानंतर या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी हिंसाचारात लक्षणीय वाढ झाल्याचे त्यात म्हटले आहे. विशेषत: खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानच्या पश्चिम प्रांतात, जेथे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या सारख्या गटांनी नागरिक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य केले आहे.
हे ही वाचा…
पाकिस्तानींना अमेरिकेत ‘नो एंट्री’, डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याचा तयारीत
