Shahbaz Sharif : आता भारताने काय केलं ? शाहबाज शरीफ यांचा अमेरिकेला फोन, पुन्हा तेच रडगाणं..
पहलगाममधील नृशंस दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षणीय वाढला आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारतावर चिथावणी देण्याचा आरोप केला, तर अमेरिकेने दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आवाहन केले. नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि ड्रोन पाडण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्यात 22 निरपराध नागरिक मारले गेले. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. याचदरम्यान आता पाकिस्तानने उचललेल्या एका पावलामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी भारतावर अनेक आरोप केले. सद्य परिस्थितीला चिथावणी देण्याचा आणि तणाव वाढवण्याचा आरोप शरीफ यांनी संभाषणादरम्यान केल्याचे समजते. एजन्सी फ्रान्स प्रेस या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले की, रुबियो त्यांच्या भारतीय आणि पाकिस्तानी समकक्षांना फोन करतील आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी त्यांना आवाहन करतील.
एप्रिलमधील हल्ल्यानंतरही मे महिन्याच्या सुरुवातीला देखील शाहबाज शरीफ यांनी मार्को रुबियो यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. यादरम्यान त्यांनी भारतावर चिथावणीखोर कारवाई केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मार्को यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला.
पाकिस्तानचा दावा काय ?
(त्यावेळी) पाकिस्तानी सैन्याने सांगितले की, मंगळवारी त्यांनी भारतीय सैन्यासोबत सहा दिवसांपूर्वी (एप्रिलमध्ये) काश्मीरमध्ये झालेल्या गोळीबारावर चर्चा केली. आम्ही नियंत्रण रेषेवरील युद्धबंदी उल्लंघनांवर चर्चा केली असं पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद चौधरी म्हणले.
दरम्यान, बुधवारी, भारतीय लष्कराने सांगितले की त्यांनी सलग सहाव्या रात्री नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. त्यांनी भारताचे दोन ड्रोन पाडले असा दावा पाकिस्तानी सैन्याने दावा केला होता.
भारत-पाक तणाव वाढता
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. या हल्ल्यानतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदूतांना देशातून हाकलून लावले. तसेच भारताने पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ भारत सोडून जाण्यास सांगितले होते. एवढंच नव्हे तर भारताने पाकिस्तानच्या हवाई दलाला नोटीसही बजावली होती. जर कोणतेही पाकिस्तानी विमान भारतीय हवाई हद्दीत घुसले तर त्यावर कारवाई केली जाईल असा त्याचा अर्थ होता.
पहलगामच्या या हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तानी दहशतवादी संघटनांना जबाबदार धरत, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवर कठोर कारवाई केली. मात्र आपल्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होत असल्याचे पाकिस्तानने वारंवार नाकारले आहे.
