AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! पाकिस्तानी जहाजावर मोठा हल्ला, तब्बल 24 नागरिक आणि..

पहलगामवरील हल्ल्यानंतर भारताचे एक वेगळेच रूप पाकिस्तानने बघितले. त्यानंतर पाकिस्तानला सळो की पळो करून भारताने सोडले. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी संरक्षण करार साैदी अरेबियासोबत केलाय. आता पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

जग हादरलं! पाकिस्तानी जहाजावर मोठा हल्ला, तब्बल 24 नागरिक आणि..
Pakistani ship
| Updated on: Sep 28, 2025 | 1:48 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत सुरक्षा करार केला. अमेरिकेत जाऊन पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. आता एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आली असून ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. पाकिस्तानने यादरम्यान इस्रायलसोबत मोठा पंगा घेतलाय. आता इस्रायल देखील पाकिस्तानच्या विरोधात मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले. इस्रायलने थेट पाकिस्तानच्या एका जहाजावर हल्ला केला. हा हल्ला लाल समुद्रात करण्यात आला. पाकिस्तानच्या जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानी जहाजावर झालेल्या हल्ल्याची पुष्टी केली असून इस्रायली हल्ल्यात पाकिस्तानी कर्मचारी मारले गेल्याचे मान्य केले. गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट म्हटले की, जहाज हुथी बंडखोरांच्या तावडीतून सुरक्षित बाहेर आलंय. या जहाजावर 27 क्रू मेंबर्स होती, यापैकी 24 जण हे पाकिस्तानी नागरिक होते. बाकी, श्रीलंकन आणि नेपाळी कामगार या जहाजावर होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जहाज 17 सप्टेंबर 2025 रोजी रास अल-इसा बंदरात पोहोचले होते. सध्या ते हुथींच्या नियंत्रणाखाली आहे.

एका इस्रायली ड्रोनने टँकरला लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे जहाजाच्या एलपीजीमध्ये मोठा स्फोट झाला. क्रू आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले आणि जहाजातील सर्वजण वाचले. मात्र, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी जहाजावर नियंत्रण मिळवत परिस्थिती हाताळली. हल्ल्यानंतर लगेचच हुथी बंडखोरांच्या बोटी घटनास्थळी पोहोचल्या असल्याचेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. त्यांनी जहाजावरील कर्मचाऱ्यांना अनेक दिवस ओलीस ठेवले होते.

पाकिस्तानच्या सरकारने या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मोठी प्रयत्न केली. ओमानमधील पाकिस्तानी राजदूत नवीद बुखारी, सौदी अरेबियाच्या सुरक्षा संस्था यांनीही त्यांना मदत केली. यादरम्यान सौदी अरेबियाने पाकिस्तानची मोठी मदत केली आणि लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला उत्तर दिले त्यानंतर पाकिस्तानने थेट साैदी अरेबियामध्ये जाऊन सुरक्षा करार केली. आता पाकिस्तानवर हल्ला म्हणजे साैदी अरेबियावर हल्ला समजला जाणार आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.