AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video| …अन् पाकिस्तानची अस्मा झाली भावूक; पंतप्रधान मोदींचे मानले आभार

युक्रेनमध्ये (Ukraine)अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थीनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. भारत सरकारने केलेल्या मदतीमुळे आपण सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याचे तिने म्हटले आहे.

Video| ...अन् पाकिस्तानची अस्मा झाली भावूक; पंतप्रधान मोदींचे मानले आभार
अस्मा शफीक
| Updated on: Mar 09, 2022 | 3:02 PM
Share

युक्रेनमध्ये (Ukraine)अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थीनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. रशिया (Russia)आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात अचानक युद्ध सुरू झाल्याने ही विद्यार्थीनी युक्रेनची राजधानी कीवमध्ये अडकली होती. भारतीय दुतावासाच्या मदतीने ही विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यामुळे तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. अस्मा शफीक असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. या विद्यार्थीनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत भारत सरकारचे आभार मानले आहेत. या विद्यार्थीनीने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, मी पाकिस्तानी आहे, युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आले होते. युद्धात मी कीवमध्ये अडकले. परंतु मला भारतीय दुतावासाने या संकटातून बाहेर काढले. त्यासाठी मी भारत सरकार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते.

काय म्हणाली अस्मा?

मी एक पाकिस्तानी विद्यार्थीनी आहे, मी युक्रेमध्ये युद्धात अडकले. कीवमधून बाहेर पडणे शक्य नव्हते. मात्र मला भारतीय दुतावासाची मदत मिळाली. भारतीय दुतावासाच्या मदतीमुळे मी सुरक्षित ठिकाणी पोहोचले. मी आता लवकरच माझ्या मायदेशी परतेल. यासाठी मी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारचे आभार मानते असे अस्मा शफीक हीने म्हटले आहे. दरम्यान भारत सरकार भारतीय विद्यार्थ्यांसोबतच नेपाळ आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना देखील युक्रेनमधून सुरक्षीत बाहेर पडण्यास मदत करत आहे.

भारताचे ऑपरेशन गंगा

हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांना आता भारतात परत आणले जात आहे. त्यासाठी भारत सरकारच्या वतीने ऑपरेशन गंगा नावाची मोहीम चालवली जात आहे. या मोहीमेंतर्गत आतापर्यंत हजारो भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून भारतात परत आणले गेले आहे. युक्रेनमध्ये सध्या हवाई वाहतूक बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांना बसमधून पोलंडच्या सीमेवर आणले जात आहे व त्यानंतर त्यांना विमानाने भारतात आणले जात आहे.

अस्माचा व्हिडीओ

संबंधित बातम्या

Photo : सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन 12 बसचा ताफा पोलंडच्या दिशेने रवाना; पाकिस्तानी, नेपाळी विद्यार्थ्यांचा देखील समावेश

Russia Ukraine War : युक्रेनमधून नागरिकांचे पलायन; मन हेलावून सोडणारी दृष्यं

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनमध्ये पुन्हा युद्धविराम

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.