AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-Iran Ceasefire : इस्लामाबाद टॉक 2.0.. अमेरिकेशी चर्चेस इराणचा नकार, पाकिस्तानने डायरेक्ट..

मध्यपूर्वेतील संघर्षानंतर अमेरिका-इराण चर्चेसाठी पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अमेरिकेचे नवीन शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल होणार असून, पहिली फेरी अयशस्वी ठरली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे, मात्र इराणने अमेरिकेच्या अवाजवी मागण्यांमुळे चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला आहे.

US-Iran Ceasefire : इस्लामाबाद टॉक 2.0.. अमेरिकेशी चर्चेस इराणचा नकार, पाकिस्तानने डायरेक्ट..
शहबाज शरीफ आणि मसूद पेजेशकियान
| Updated on: Apr 20, 2026 | 8:53 AM
Share

गेल्या 2 महिन्यांपासून पेटलेला मध्यपूर्वेतील संघर्ष शांत होत असतानाच आता इस्लामाबादमध्ये राजनैतिक हालचाली पुन्हा तीव्र झाल्या आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची पहिली फेरी अयशस्वी झाल्यानंतर, आज ( सोमवार 20एप्रिल) अमेरिकेचे एक नवीन शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल होणार आहे. विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर इस्लामाबादला जाण्याच्या तयारीत असल्याची पुष्टी व्हाईट हाऊसने केली आहे. मात्र उपराष्ट्रपती जेडी व्हान्स हे पाकिस्तानात जातील की नाही, यायबाबत अद्याप अनिश्चितता आहे. दरम्यान, इराणने अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळून लावला असून चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवर संवाद साधल्याचे समजते.

शहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्याशी फोनवर संवाद साधून प्रदेशातील ताज्या परिस्थितीचा आढावा घेतला, असं पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाद्वारे सांगण्यात आलं. युद्धग्रस्त प्रदेशात चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकमत घडवण्याच्या उद्देशाने सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कीसोबत झालेल्या अलीकडील चर्चेची माहिती शहबाज शरीफ यांनी पेझेश्कियान यांना दिली.

इस्लामाबादमधील चर्चेसाठी शहबाज शरीफ आणि पेझेश्कियान यांच्यात फोनवर जे संभाषण झालं त्याची वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. संतप्त इराणने सध्या अमेरिकेचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे. अमेरिकेने केलेल्या अवाजवी मागण्यांमुळे इराणने चर्चेत सहभाही होण्यास नकार दिल्याचे वृत्त इराणची सरकारी वृत्तसंस्था, इर्नाने (IRNA) दिलं आहे.

इराणचा युक्तिवाद काय ?

अमेरिकेच्या “अवाजवी मागण्या, भूमिकेतील वारंवार होणारे बदल आणि परस्परविरोधी विधाने” या परिस्थितीसाठी जबाबदार आहेत असं इराणने म्हटलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी आणि तिच्या बंदरांची अमेरिकेने केलेली नौदल नाकेबंदी,. म्हणजे शस्त्रसंधीचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्यातील चर्चेवर काही करार होईल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शहबाज शरीफ इराणला चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी सहमत होण्यास राजी करू शकतील का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

गेल्या आठवड्यात इस्लामाबादमधील चर्चेची पहिली फेरी अयशस्वी ठरली असली तरी, अमेरिका आणि इराण या दोघांनीही पाकिस्तानच्या भूमिकेची प्रशंसा केली होती. यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनीही तेहरानला भेट दिली. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील चर्चेसंदर्भात पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष पाकिस्तानवर केंद्रित झाले आहे.

इस्लामाबादेत हालचालींना वेग

दरम्यान, इस्लामाबादमधील हालचाली तीव्र झाल्या आहेत. पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, C-17 ग्लोबमास्टर III सारखी अमेरिकेची मोठी लष्करी विमाने इस्लामाबादच्या अगदी जवळ असलेल्या रावळपिंडी येथील नूर खान हवाई तळावर उतरली आहेत. विमानतळापासून इस्लामाबादच्या रेड झोनकडे जाणारे रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले असून, यावरून वाढलेली सुरक्षा परिस्थिती दिसून येते. इस्लामाबादमधील प्रमुख हॉटेल्स, विशेषतः सेरेना हॉटेल आणि मॅरियट हॉटेल, देखील रिकामी केली जात आहेत. नवीन बुकिंग स्थगित करण्यात आली आहेत. सेरेना हॉटेलमध्ये 11 एप्रिल रोजी चर्चेची पहिली फेरी आयोजित करण्यात आली होती.

22 तारखेला संपणार युद्धविराम

अमेरिका आणि इराण यांच्यात यापूर्वी 11 आणि 12 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये चर्चा झाली होती, परंतु कोणताही करार झाला नाही. आता, चर्चेच्या नवीन फेरीमुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याची आणि बुधवार, 22 एप्रिल रोजी संपणाऱ्या दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...