AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

37,000 फूट उंचीवर विमान, दोन पायलट गाढ झोपेत, कसे वाचले प्रवाशांचे प्राण?

ही घटना सोमवारची आहे. या विमानाने सुडानच्या खार्तून येथून इथोपियाच्या राजधानी अदीस अबाबासाठी टेक ऑफ केले होते. फ्लाईट अदीस अबाबा एयरपोर्टजवळ पोहचले मात्र फ्लाईट खाली येण्याचे काही चिन्हे दिसेनात. त्यावेळी एयर ट्राफिक कंट्रोलने अलर्ट जारी केला. एटीसीने अनेकदा पायलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही

37,000 फूट उंचीवर विमान, दोन पायलट गाढ झोपेत, कसे वाचले प्रवाशांचे प्राण?
दोन्ही पायलट झोपले मग..Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 19, 2022 | 7:29 PM
Share

अदीस अबाबा – सध्याच्या युगात कुठल्याही प्रवासात विमान प्रवास (Air travel)हा सर्वात जलद मानण्यात येतो. विमानाची गती अगदी कमी वेळात प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवते. मात्र हीच गती कधीकधी धोक्याचीही ठरण्याची शक्यता असते. अशीच एक घटना अफ्रिकी देश इथोपियात पाहायला मिळाली आहे. नेमके झाले असे की सुडानच्या खार्तूम येथील इथोपियाची राजधानी अदीस अबाबा (Adis Ababa)जाणाऱ्या फ्लाईटमध्ये असलेले दोन्ही पायलट लँडिंगपूर्वी गाढ झोपून (pilot slept before landing) गेले. त्यामुळे बोईंग 737चे अदीस अबाबा एयरपोर्टवर लँडिंगच होऊ शकले नाही. हे पायलट जेव्हा गाढ झोपले होते तेव्हा विमान 37 हजार फूट उंचीवर होते. पायलट झोपलेले असल्याने ना विमानाने लँडिंगसाठी स्पीड कमी केले ना विमानाने उंची कमी केली. एयर ट्राफिक कंट्रोलच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पायलटना मेसेज पाठवले, पण ते दोघेही इतक्या झोपेत होते की त्यांनी ते मेसेज पाहिलेही नाहीत.

पायलटची झोप कशी भंगली

ही घटना सोमवारची आहे. या विमानाने सुडानच्या खार्तून येथून इथोपियाच्या राजधानी अदीस अबाबासाठी टेक ऑफ केले होते. फ्लाईट अदीस अबाबा एयरपोर्टजवळ पोहचले मात्र फ्लाईट खाली येण्याचे काही चिन्हे दिसेनात. त्यावेळी एयर ट्राफिक कंट्रोलने अलर्ट जारी केला. एटीसीने अनेकदा पायलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. अशा स्थितीत जेव्हा विमानाने रनवे क्रॉस केला, त्यांचा ऑटोपायलट मोड डिसकनेक्ट झाला. त्यामुळे केबिनमध्ये एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. या अलार्ममुळे या दोनी पायलटना जाग आली. त्यानंतर त्यांनी गडबडीत विमानाचे लँडिंग केले.

जाग आल्यानंतर 25 मिनिटांनी लँडिंग

जाग आल्यानंतर या दोन्ही पायलटना विमान लँड करण्यासाठी 25 मिनिटांचा वेळ लागला. या काळात विमानाने एयरपोर्टभोवती अनेक वेळा चकरा मारल्या. सुदैवाने यात कोणताही अपघात झाला नाही आणि विमान सुरक्षितपणे खाली उतरले. त्यानंतर विमानाला पुढे जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर अडीच तासांच्या चौकशीनंतर विमानाला पुढचा टेक ऑफ घेण्यास परवानगी देण्यात आली. एव्हिएशन सर्विलान्स सिस्टिमने हे विमान रनवेवर न उतरता, उडून गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या विमानाचा फ्लाीट पाथ दाखवणारा एक फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. यात हे विमान अदीस अबाबा विमानतळाच्या वर घिरट्या घालत असतानाचे दिसते आहे.

पायलट दमले असल्याचे दिले कारण

एव्हिएशन एनालिटिक्स एलेक्स मैकेरास यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे, त्यात त्यांनी घडलेला प्रकार गंभीर असल्याचे लिहिले आहे. हे पायलट खले असल्याने हा प्रकार झाल्याचे त्यांनी लिहले आहे. अशा प्रकारची एक घटना मेमध्येही घडली होती. त्यावेळी दोन पायलट विमान घेऊन न्यूयॉर्कवरुन रोमला जात होते. त्यावेळी ते दोघेही विमानात झोपले होते. त्यावेळी त्यांचेही विमान 38 हजार फूट उंचीवर होते. तपासात हे स्पष्ट झालेले आहे. आयटीए एयरवेजचे हे दोन्ही पायलट असल्याचेही सांगण्यात येते आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.