PM Modi Kuwait Visit : कुवैतमध्ये पंतप्रधान मोदींना मिळाला सर्वोच्च पुरस्कार त्यामागचा अर्थ काय?
PM Modi Kuwait Visit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवैतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार देण्यामागे अनेक अर्थ दडलेले आहेत. मूळात कुवैत हा जगाच्या पाठिवरील एक छोट्सा देश आहे. आज जागतिक राजकारणात हा देश महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या देशाचा एकूण प्रवास कसा आहे? त्यांची आर्थिक संपन्नता, लोकसंख्या याबद्दल जाणून घ्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच कुवैत दौरा पार पडला. कालच दोन दिवसीय दौरा आटोपून पंतप्रधान मोदी भारतात परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कुवैत दौरा खास होता. कारण 43 वर्षानंतर कुवैत दौऱ्यावर जाणारे पंतप्रधान मोदी पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. त्यांच्याआधी फक्त इंदिरा गांधी यांनी 1981 साली कुवैतचा दौरा केला होता. आखाती देशांमधील कुवैत हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कुवैत दौऱ्यात ‘विसम मुबारक अल-कबीर’ किंवा ‘ऑर्डर ऑफ मुबारक दे ग्रेट’ या कुवैतच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलं. कुवैतचे एमीर शेख मीशाल अल-अहमद अल-जाबीर अल-साबह यांनी पंतप्रधान मोदींना या पुरस्कराने सन्मानित केलं. हा पुरस्कार काय आहे? आणि पंतप्रधान मोदींना तो मिळाला, यामागच महत्त्व काय? हे समजून घ्या. ...
