AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga predicts : अखेर बाबा वेंगांचं ते भाकीत खरं ठरलं, भारताच्या शत्रू राष्ट्रावर मोठं संकट, उडाला हाहाकार

बाबा वेंगा यांनी 2025 बाबत काही भयानक आणि चिंता वाढवणारे भाकीतं केले होते, हे भाकीतं आता खरे होत असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

Baba Vanga predicts : अखेर बाबा वेंगांचं ते भाकीत खरं ठरलं, भारताच्या शत्रू राष्ट्रावर मोठं संकट, उडाला हाहाकार
Image Credit source: social media
| Updated on: Jul 26, 2025 | 6:43 PM
Share

बाबा वेंगा या एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या, त्यांनी आपल्या हयातीमध्ये केलेली अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. बाबा वेंगा यांचा जन्म बग्लेरियामध्ये 1911 साली झाला, तर मृत्यू 1996 साली झाला. त्यांच्याबाबतीत एक असा दावा देखील केला जातो की, एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली होती, मात्र त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली.

दरम्यान बाबा वेंगा यांनी 2025 बाबत काही भयानक आणि चिंता वाढवणारे भाकीतं केले होते, हे भाकीतं आता खरे होत असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. 2025 हे वर्ष जगाच्या अंताची सुरुवात असेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं. या वर्षी मोठ्या प्रमाणात युद्ध होतील, महापूर येईल, विनाशक असे भूकंप होतील आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी होईल असं भाकीत बाबा वेंगा यांनी वर्तवलं होतं.

दरम्यान बाबा वेंगा यांचं हे भाकीत खरं होताना दिसत आहे. या वर्षांच्या सुरुवातीलाच जगात काही ठिकाणी शक्तिशाली भूकंपाच्या घटना घडल्या होत्या, त्यानंतर जपानमध्ये देखील भूकंप झाला. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थोडक्यात टळलं, तर दुसरीकडे इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं. आता बाबा वेंगा यांनी केलेली महापुराबाबतची भविष्यवाणी देखील खरी ठरत असल्याचं दिसून येत आहे.

चीनला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे, चीनची राजधानी बिजिंगमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. बिजिंगच्या शेजारीच असलेलं आणि औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाओडिंग शहरात एकाच दिवसामध्ये वर्षभराचा पाऊस पडला आहे. पावसाने नवा विक्रम केला असून दिवसभरात तब्बल 448.7 मीमी पावसाची नोंद झाली आहे, महापूर आला असून, मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर सुरू आहे, अतिमुसळधार पावसामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.