पाकिस्तानात पेट्रोल महागले; साखर कडू

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 06, 2021 | 12:22 PM

पाकिस्तानमध्ये महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. वाढत्या महागाईमुळे अत्यावश्यक वस्तूंची खरेदी देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. पेट्रोलपेक्षाही साखरेचे दर वाढले आहेत.

पाकिस्तानात पेट्रोल महागले; साखर कडू
महाराष्ट्र ठरणारं ‘शुगर कॅपिटल’

कराची – Pakistan Sugar Prices: पाकिस्तानमध्ये महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. वाढत्या महागाईमुळे अत्यावश्यक वस्तूंची खरेदी देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. पेट्रोलपेक्षाही साखरेचे दर वाढले आहेत. पाकमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 138.30 रुपये आहेत, तर साखरेचा भाव मात्र 150 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांमध्ये साखरेचे दर सातत्याने वाढत असून, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात साखरेचे भाव आठ रुपयांनी वाढले आहेत. इमरान खान सरकारने अत्यावश्यक वस्तूंच्या दरावर नियंत्रण आणले जाईल असे आश्वासन जनतेला दिले होते मात्र तरी देखील देशात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे.

पाकिस्तानमध्ये व्यापाऱ्यांकडून साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. लाहोरमध्ये काही दिवसांपूर्वी साखरेचे भाव प्रति किलो 126 रुपये होते. मात्र अवैध पद्धतीने नफा कमावण्यासाठी व्यापाऱ्यांनी साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याने गेल्या महिन्याभरत भाव 24 रुपयांनी वाढून 150 रुपयांवर पोहोचले आहेत. तर कराचीमध्ये साखरेचे दर प्रति किलो 142 रुपये इतके आहेत. क्वोटामध्ये साखर प्रति किलो 129 रुपयांच्या भावाने विकली जात आहे.

120 अब्ज रुपयांच्या अनुदानाची घोषणा

पाकिस्तानमधील वाढती महागाई पाहाता, सरकारकडून 120 अब्ज रुपयांच्या अनुदानाची घोषणा करण्यात आली , या अनुदानामधून अत्यावश्यक वस्तू  जसे पीठ, तूप, तेल, साखर, या सारख्या पदार्थांवर 30 टक्के अनुदार देण्यात यावे असे सरकारने म्हटले होते. मात्र अद्यापही अनुदान न मिळाल्याने पाकिस्तानमधील नागरिकांचे महागाईमुळे जगणे कठीण झाले आहे. साखरेप्रमाणेच इतर वस्तूंचे दर देखील गगनाला भिडले आहेत. यावर आता सरकार का तोडगा काढणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

 अनेक देशात साखरेची टंचाई 

सध्या अवघे जग ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे इंधनाला स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून अनेक देश ऊसापासून इथेनॉल निर्मिती करत आहेत. ऊसापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती होत असल्याने अनेक देशात सध्या साखरेची टंचाई आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. त्यामुळे भारतातील साखरेला परदेशात मोठी मागणी असते. गेल्या काही दिवसात भारताने देखील साखरेची निर्यात वाढल्याने देशात साखरेचे दर  काही प्रमाणात वढले आहेत.

संबंधित बातम्या 

श्रीनगर-शारजाह विमानासेवेसाठी मार्ग मोकळा करावा, भारताने पाकिस्तानला केली विनंती

Afghanistan Foreign Currency ban: तालिबानने अफगाणिस्तानात विदेशी चलनाच्या वापरावर घातली बंदी

VIDEO: जो बिडेन ते बोरिस जॉन्सन; बघा जगभरातील काणकाणत्या नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI