Trump-Putin Meeting : 2022 साली ट्रंप राष्ट्रपती असते तर ही वेळच आली नसती.. अलास्का मीटिंगमध्ये पुतीन असं का म्हणाले ?
Trump-Putin Alaska Meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या अलास्कात झालेल्या बैठकीकडे सर्व जगाचं लक्ष लागलं होतं. अलास्कामधील त्यांच्या मीटिंगमध्ये युक्रेन युद्ध आणि परस्पर संबंधांवरही सखोल चर्चा झाली. या बैठकीनंतर पुतीन यांनी ट्रंपना रशियात येण्याचेही निमंत्रण दिलं.

Trump-Putin Alaska Meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या अलास्कात झालेल्या बैठकीकडे सर्व जगाचं लक्ष लागलं होतं. अलास्कामधील त्यांच्या मीटिंगमझ्ये युक्रेन युद्ध आणि परस्पर संबंधांवरही सखोल चर्चा झाली. बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी चर्चा सकारात्मक असल्याचे आणि संवाद पुढेही सुरूच राहील असे संकेत दिले. याचदरम्यान व्लादिमीर पुतीन म्हणाले की, 2020 नंतर ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये असते तर ही वेळच आली नसती.
“ जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात की 2022 साली जर ते राष्ट्राध्यक्ष असते, तर युद्ध झालेच नसते. मला खात्री आहे की हे खरं आहे, तेव्हा ते व्हाईट हाऊसमध्ये असते तर ही वेलच आली नसती. मी याला दुजोरा देऊ शकतो”, असे पुतिन म्हटल्याचे वृत्त समोर आले आहे.
ही बैठक चांगली झाली असल्याने त्यांना सध्या रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादण्याचा “विचार करण्याची गरज नाही” असं ट्रंप म्हणाले. मात्र दोन-तीन आठवड्यांनंतर परिस्थिती पाहिल्यानंतर ते यावर पुनर्विचार करू शकतात असंही त्यांनी नमूद केलं. ट्रम्प यांनी सांगितले की पुतिन यांनी त्यांचे कौतुक केलं, ‘मी कधीही कोणालाही इतक्या लवकर इतके काम करताना पाहिले नाही. तुमचा देश खूप वेगाने प्रगति करत आहे, पण गेल्या वर्षभरापूर्वी तो जवळपास संपत आला होता’ असंही पुतीन म्हणाल्याचं ट्रंप यांनी नमूद केलं.
पुतिन म्हणाले – ‘Your country is like hot as a pistol’
‘Your country is, like, hot as a pistol and a year ago he thought it was dead.’ असं पुतीन म्हणाल्याची माहिती समोर येत आहे. आता हे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर अवलंबून आहे की ते कराराकडे कोणती पावले उचलतात. बैठकीत अनेक मुद्द्यांवर एकमत झाले आहे, परंतु एक मोठा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे असंही ते ( ट्रंप) म्हणाले.
ट्रम्प म्हणाले, ‘एखादा करार पूर्ण होईपर्यंत कोणताही करार होत नाही’. पुतिन यांना आता लोक मरताना पहायचे नाहीत आणि फक्त काही मुद्दे सोडवायची त्यांची इच्छा असल्याचे ट्रंप म्हणाले. एवढेच नव्हे तर ते लवकरच पुतिन यांना पुन्हा भेटू शकतात असे संकेतही ट्रंप यांनी दिले.
रशियाला संपवायचंय युद्ध
मीटिंगमधील आमच्या संभाषणाचा मोठा भाग युक्रेन संकटावर केंद्रित होता, असं पुतिन यांनी नमूद केलं. रिस्थिती सुधारणे आवश्यक आहे आणि संघर्षाचे खरे कारण समजून घेण्यासाठी त्यांनी ट्रम्पच्या प्रयत्नांचे कौतुक केले. या सहमतीमुळे युक्रेनमध्ये शांततेचा मार्ग मोकळा होईल आणि त्याची सुरक्षा सुनिश्चित होईल अशी आशा पुतिन यांनी व्यक्त केली. रशिया प्रामाणिकपणे युद्ध संपवू इच्छित आहे असं स्पष्ट करतानाच युरोप आणि युक्रेन चर्चेत व्यत्यय आणणार नाहीत अशी आशा पुतिन यांनी व्यक्त केली.
रशियाला येण्याचंही ट्रंप यांना दिलं निमंत्रण
पुतिन पुढे म्हणाले की, आर्क्टिक क्षेत्रातही रशिया-अमेरिका सहकार्य शक्य आहे आणि दोन्ही देशांमध्ये व्यावसायिक गुंतवणुकीसाठी मोठी क्षमता आहे. 2022 साली ट्रंप जर राष्ट्रपती असते तर हा संघर्ष सुरूच झाला नसता, असा दावा पुतिन यांनी केला. ही पत्रकार परिषद एका अनोख्या पद्धतीने संपली. पुतिन यांनी ट्रम्प यांना रशियात येण्याचे इंग्रजीत आमंत्रण दिले आणि ‘नेक्स्ट टाइम इन मॉस्को’ असे म्हटले, म्हणजेच पुढची बैठक मॉस्कोमध्ये होईल. यावर ट्रम्प हसत म्हणाले – ‘हे मनोरंजक आहे’.
