ट्रम्पना भेटायला आलेल्या पुतिन यांनी अमेरिकन नागरिकाला शानदार बाईक गिफ्ट दिली,काय कारण ?
अमेरिकेतील वॉरेन नामक व्यक्तीला रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी महागडी युराल मोटरसायकल गिफ्ट म्हणून दिली आहे.काय आहे या मागचे कारण ?

गेल्या आठवड्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुति यांच्या दरम्यान अलास्काच्या एंकोरेज बैठक झाली. या बैठकीने युक्रेन युद्ध थांबले नसले तरी एका अमेरिकन व्यक्तीचे नशिब उघडले आहे. एका अमेरिकन व्यक्तीला रशियन राष्ट्राध्यक्षाच्यावतीने पर्सनल गिफ्ट मिळाले असून रशियन राष्ट्राध्यक्षाकडून एखाद्या सर्वसामान्य परदेशी नागरिकाला असे गिफ्ट मिळणे दुर्मिळच म्हटले जाते. या व्यक्तीला रशियन सरकारने एक शानदार युराल मोटरसायकल मिळाली असून तिची किंमत 22,000 डॉलर म्हणजे 19 लाख 19 हजार 358 रुपये आहे.
वास्तविक झाले असे की पुतीन-ट्रम्प यांच्या अलास्काच्या बैठकीच्या एक आठवड्याआधी कोणा टेलिव्हीजन क्रु सोबत अमेरिकन नागरिक वॉरेन यांची एक मुलाखत झाली होती. त्यात त्यांनी आपली युराल गिअर अप मोटरसायकलची खराब झालेली अवस्था कथन केली होती.
मोटरसायकल कंपनी युराल सोव्हिएत रशिया असताना 1941 मध्ये स्थापन झाली होती. जे आता कझाकिस्तानच्या पेट्रोपावलोव्स्कमध्ये आपली बाईक असेंबल करते आणि वॉशिंग्टनच्या वुडिनविले स्थित एक टीमद्वारे त्यांना वितरीत करते. परंतू फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्याने रशियातून युरालचे सुटे भाग अमेरिकेत जाणे बंद झाले आहे.
वॉरेन याने आपल्या शेजाऱ्याकडून जुनी युराल घेतली
वॉरेन यांनी त्यांच्या शेजाऱ्याकडून जुनी युराल मोटरसायकल विकत घेतली होती. परंतू रशियन निर्बंधामुळे वॉरेनला खूपच त्रास झाला,आणि स्पेअर पार्ट्स नसल्याने त्याची युराल बाईक नीट चालत नव्हती. व्हायरल व्हिडीओ वॉरेन या संदर्भात तक्रार करताना दिसले.
व्हिडीओ व्हायरल झाल्याबद्दल वॉरेन म्हणतात की माझा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, आणि वेड्यासारख्या लोक तो पाहात आहेत. मला माहीतीच नव्हते,कारण मी एक साधारण व्यक्ती आहे. त्यांनी युरालवर माझ्यासारख्या बुजुर्गाची मुलाखत घेतली आणि माहीती नाही त्यांना का आवडली.
त्यानंतर ट्रम्प आणि पुतीन यांच्या बैठकीच्या दोन दिवस आधी १३ ऑगस्टला, वॉरेन यांना एका रशियन पत्रकाराचा फोन आला. त्याने सांगितले की,’ त्यांनी तुम्हाला एक बाईक देण्याचा निर्णय घेतला आहे.’
पत्नीसह बाईक घेण्यास पोहचले
वॉरेन यांनी सांगितले की त्यांना मिळालेल्या डॉक्टमेंट्स वरुन समजते की गिफ्टची व्यवस्था अमेरिकेतील रशियन दुतावासाद्वारे केली होती. वॉरेन म्हणाले मला वाटले आधी काही स्कॅम असेल. परंतु गेल्या शुक्रवारी तीन तासांच्या बैठकीनंतर पुतीन आणि ट्रम्प यांच्या जॉईंट बेस एल्मेंडॉर्फ-रिचर्डसन येथून रवाना झाल्यानंतर, त्यांना एक आणखी कॉल आला त्यात सांगितले गेले की बाईक बेस वर आहे.
त्यांना सांगण्यात आले की एंकारेज येथील एका हॉटेलमध्ये येऊन मोटरसायकल घेऊन जावे. वॉरेन त्यांच्या पत्नीसोबत हॉटेलमध्ये गेले. आणि तेथे त्यांना सहा माणसे दिसली ते रशियन वाटत होते. तेथे त्यांना मोटरसायकल दिसली. जिला पाहून त्यांच्या आनंदाला पारावार राहीला नाही. मोटरसायकलची किंमत 22,000 डॉलर होती. त्यांना विश्वासच बसेना. बाईकच्या बदल्यात रशियन लोकांना त्यांचा बाईक सोबतचा फोटो आणि व्हिडीओ हवा होता. वॉरेन यांनी सांगितले की ते कागदपत्रांवर सह्या करीत होते तेव्हा त्यांनी बाईकच्या निर्मितीची तारीख पाहीली तर ती 12 ऑगस्ट होती. म्हणजे ही बाईक थेट जेटमध्ये टाकून आणण्यात आली होती.
