AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने पाकिस्तानवर मिसाईल डागले त्या रात्री बलाढ्य रशियाचे राष्ट्रपती का घाबरले?; धसका कशाचा? काय घडणार होतं असं?

भारताच्या पाकिस्तानवरील हवाई हल्ला आणि युक्रेनच्या रशियावरील ड्रोन हल्ल्यांमुळे जगभर चिंता पसरली होती. या घटनांमुळे रशियाचे राष्ट्रपती पुतीन घाबरले, हे त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती ट्रम्प यांना सांगितले. 7 मे रोजीच्या रात्री घडलेल्या घटनेमुळे मी थोडा घाबरलो होतो, असं पुतिन यांनी ट्रम्प यांच्याशी बोलताना स्पष्ट केलं होतं. कशाचा धसका घेतला होता तेही त्यांनी ट्रम्प यांना सांगितलं होतं.

भारताने पाकिस्तानवर मिसाईल डागले त्या रात्री बलाढ्य रशियाचे राष्ट्रपती का घाबरले?; धसका कशाचा? काय घडणार होतं असं?
Vladimir PutinImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 21, 2025 | 2:09 PM
Share

भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर अख्खा जगाला चिंतेने घेरलं होतं. अनेक देशांनी हे युद्ध होऊ नये म्हणून देव पाण्यात घातले होते. त्याच रात्री यूक्रेन आणि रशियानेही एकमेकांवर ड्रोन हल्ले केले होते. त्यामुळे रशिया सारख्या बलाढ्य देशाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन सुद्धा त्या रात्री घाबरले होते. या सर्व घडामोडींमुळे पुतीन यांना मोठा धक्का बसला होता. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा करताना पुतीन यांनी हा किस्सा शेअर केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेवेळी व्लादिमीर पुतीन यांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली होती. मी गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच 7 मे रोजीच्या रात्री थोडा घाबरलो होतो, असं पुतीन यांनी ट्रम्प यांना म्हटलंय. पुतीन यांनी जी तारीख ट्रम्प यांना सांगितली, त्याच तारखेला भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता. भारताच्या या स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातील 100हून अधिक अतिरेकी मारले गेले होते. तसेच पाकिस्तानातील अतिरेक्यांची 9 ठिकाणेही नेस्तनाबूत करण्यात आली होती.

पुतीन नेमकं काय म्हणाले?

तास समाचार एजन्सीच्या वृत्तानुसार, सीजफायरमध्येही यूक्रेनने मॉस्कोवर ड्रोनने हल्ले केले होते. हा हल्ला 7 मे रोजी रात्री झाला होता. यूक्रेनने रशियावर त्या रात्री सुमारे 564 ड्रोन डागले होते. चीन आणि इतर देशांच्या मोठ्या राष्ट्राध्यक्षाांना मॉस्को येऊ द्यायचे नाही हा यूक्रेनचा डाव होता. पण आम्ही ड्रोन हल्ले संपुष्टात आणण्यासाठी तात्काळ अनेक प्रयत्न केले, असं पुतीन यांनी ट्रम्प यांना सांगितलं.

त्या रात्री मी थोडा घाबरलो होतो. मला वाटलं यूक्रेनच्या भीतीने चीन आणि जगातील लोक यूक्रेनला घाबरतील. त्याचा थेट परिणाम मॉस्कोच्या व्हिक्ट्री परेडवर पडेल, असं पुतीन म्हणाले होते. 9 मे रोजी मॉस्कोत व्हिक्ट्री परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे होते. जिनपिंग यांच्यासह या परेडमध्ये जगातील इतर देशाच्या पाहुण्यांनाही बोलावण्यात आलं होतं.

त्याच रात्री भारताची स्ट्राईक

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये लश्कर ए तोयबा समर्थित द रेजिडेंट फ्रंट्सच्या दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 नागरिकांना ठार मारलं होतं. त्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाण्यांना लक्ष्य केलं होतं. 7 मे रोजी रात्री भारताने लष्कर, जैश आणि हिज्बुलच्या 9 ठिकाण्यांवर एअर स्ट्राईक केली होती. या स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.

या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान मोठं युद्ध होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे जगाला या युद्धाचं टेन्शन आलं होतं. पाकिस्तानच्या सैन्याने दहशतवाद्यांचा ढाली सारखा वापर केला. त्यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाल्याचा भारताचा दावा आहे. दरम्यान, 11 मे रोजी दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा करून एकमेकांवरील हल्ले थांबवले होते.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.