AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत हादरला! पाकिस्तानातील अण्वस्त्रांबाबत धक्कादायक अहवाल, युरेनियमबाबत थेट…

भारत आणि पाकिस्तानमधील मागील काही दिवसात संबंध ताणले गेले. भारताच्या विरोधात पाकिस्तान दहशतवाद्यांच्या माध्यमातून मोठा कट रचताना दिसतो. हेच नाही तर पहलगाम हल्ल्यानंतर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता एक धक्कादायक अहवाल पुढे आला आहे.

भारत हादरला! पाकिस्तानातील अण्वस्त्रांबाबत धक्कादायक अहवाल, युरेनियमबाबत थेट...
nuclear weapons
| Updated on: Sep 05, 2025 | 9:04 AM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांना टार्गेट करत थेट गोळ्या झाडल्या. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधात राबवले. मात्र, दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली. फक्त हेच नाही तर मोठ्या प्रमाणात हल्ले केली जात होती. आता भारताचे टेन्शन वाढवणारी एक अत्यंत मोठी बातमी ही पुढे येताना दिसत आहे. पाकिस्तानबद्दलचा एक अहवाल हा पुढे आला आहे. हा अहवाल पाकिस्तानातील अण्वस्त्रांशी संबंधित आहे. बुलेटिन ऑफ अणुशास्त्रज्ञांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा एक मोठा आढावा घेतला, ज्यामधून खळबळ उडवणारी माहिती पुढे आलीये.

नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानकडे आताच्या परिस्थितीला 170 अण्वस्त्रे आहेत. अमेरिकन संरक्षण गुप्तचर संस्थेने 1999 मध्ये अंदाज लावला होता की 2020 पर्यंत पाकिस्तानकडे 60 ते 80 अण्वस्त्रे असतील. मात्र, तसे न होता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पाकिस्तानकडून खूप मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रे विकसित करण्यात आली आहेत. हा अत्यंत मोठा धोका जगासाठी नक्कीच असणार आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे.

यासोबतच रिपोर्टमधून अजून एक मोठा दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानने अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी मोठी सक्षम अशी काही शस्त्रे तयार केली आहेत. पाकिस्तानकडे चार प्लुटोनियम उत्पादन अणुभट्ट्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात युरेनियम समृद्धीकरण पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. यामुळेच आता येत्या काही वर्षात पाकिस्तानातील अण्वस्त्रे आणखीन वाढू शकतात आणि तशी दाट शक्यता देखील आहे.

भारतापेक्षा पाकिस्तान हा अण्वस्त्रे वाढवत आहे. हेच नाही तर जर भारताने आपल्या अण्वस्त्रांमध्ये वाढ केली तर लगेचच पाकिस्तान देखील करणार आहे. यावर अजूनही पाकिस्तान सरकारने कोणतेही विधान केले नाहीये. मात्र, पाकिस्तानमध्ये वाढणारी अण्वस्त्रे यामुळे जगाने धसकी घेतली आहे. सातत्याने संख्येत वाढ होताना दिसत आहे. आता यावर भारत नेमकी काय भूमिका घेतो, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. पाकिस्तान दिवसेंदिवस अण्वस्त्रांवर काम करतोय.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.