AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Putin Humiliate Shehbaz : पुतिन यांनी शहबाज शरीफ यांचा अपमान का केला? या सगळ्याच S-400 शी काय कनेक्शन, नवीन खळबळजनक गौप्यस्फोट

Putin Humiliate Shehbaz : तुर्कीचे प्रमुख एर्दोगन आणि पुतिन यांच्यात सुरु असलेल्या बैठकीत शहबाज शरीफ जबरदस्ती घुसले. पुतिन यांना भेटून ते स्पष्टीकरण देत होते. त्याशिवाय F-16 फायटर जेट्सच्या दुरुस्तीसाठी अमेरिकेतून जो फंड येतोय, हा करार 2022 साली बायडेन प्रशासनाच्यावेळीच झाला होता.

Putin Humiliate Shehbaz : पुतिन यांनी शहबाज शरीफ यांचा अपमान का केला? या सगळ्याच S-400 शी काय कनेक्शन, नवीन खळबळजनक गौप्यस्फोट
pakistan pm Shehbaz Sharif Image Credit source: GettyImages
| Updated on: Dec 15, 2025 | 3:23 PM
Share

पाकिस्तानी सैन्याचे माजी अधिकारी आदिल रजा यांनी पाकिस्तानी सैन्यालाच धमकी दिली आहे. पाकिस्तानी सैन्याने जर मला मारण्याचा प्रयत्न केला तर मागच्या दोन महिन्यांपासून चीनमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाचा खुलासा करतील. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI ने S-400 एअर डिफेन्स सिस्टिमची टेक्नोलॉजी चोरण्यासाठी आपल्या एजेंट्सना रशियात पाठवलं होतं, असा दावा आदिल रजा यांनी आपल्या व्हिडिओतून केला आहे. हे एजंट्स तिथे पकडले गेले, असं आदिल रजा म्हणाले. त्यांनी व्हिडिओमध्ये त्या शिवाय अनेक सनसनाटी दावे केले आहेत. पाकिस्तानने यासाठी हे केलं, कारण त्यांच्याकडे एअर डिफेन्स सिस्टिम नाहीय. चीन त्यांना नवीन एअर डिफेन्स सिस्टिम देत नाहीय.

ऑपरेशन सिंदूरच्यावेळी इंडियन एअर फोर्सच्या हल्ल्यात पाकिस्तानचं 70 टक्के एअर डिफेन्स नेटवर्क उद्धवस्त झालं आहे. पाकिस्तानकडे चिनी बनावटीची HQ-9B एअर डिफेन्स सिस्टिम आहे. ब्रह्मोस आणि स्कॅल्प या मिसाइल्सना रोखण्यात ही एअर डिफेन्स सिस्टिम पूर्णपणे अपयशी ठरली. इंडियन एअर फोर्सने आपल्या ड्रोन हल्ल्यात HQ-9B एअर डिफेन्स सिस्टिमचं रडार लाहोरमध्ये उद्धवस्त केलं. त्यानंतर पाकिस्तान नव्या एअर डिफेन्स सिस्टिमसाठी चीनच्या मागे लागला आहे. पण चीन त्यांना ते द्यायला तयार नाहीय.

चिनी एअर डिफेन्स सिस्टिममध्ये अनेक रशियन भाग

आदिल रजा यांनी सांगितलं की, पाकिस्तानचे अनेक अधिकारी जे फक्त दोन आठवड्यांसाठी चीनला गेले होते, ते मागच्या दोन महिन्यांपासून तिथेच होते. पण चीन त्यांना एअर डिफेन्स सिस्टिम द्यायला तयार नाहीय. आदिल रजा यांनी पाकिस्तानी सैन्याला धमकी दिलीय. त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला, तर ते सर्व अधिकाऱ्यांची नाव सार्वजनिक करतील. चीनकडून एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेण्यासाठी पाकिस्तानकडे पैसे नाहीयत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याशिवाय चिनी एअर डिफेन्स सिस्टिममध्ये अनेक रशियन भाग आहेत. म्हणून चीन पाकिस्तानला एअर डिफेन्स सिस्टिम द्यायला तयार नाहीय. ISI ने आपल्या लोकांना S-400 ची टेक्नोलॉजी चोरण्यासाठी रशियाला पाठवलं, पण तिथे ते पकडले गेले, असा गौप्यस्फोट सुद्धा त्यांनी केला. म्हणून पुतिन यांनी शहबाज शरीफ यांना 40 मिनिटापेक्षा जास्त वेळ वाट पहायला लावली. मात्र, तरीही भेटायला नकार दिला.

संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?.
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.