Corona Vaccine | कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वी, रशियाचा दावा

कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा रशियाच्या सेकनोफ युनिव्हर्सिटीने केला आहे (Russia claims worlds first corona vaccines human trial success).

Corona Vaccine | कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वी, रशियाचा दावा

मॉस्को : कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा रशियाच्या सेकनोफ युनिव्हर्सिटीने केला आहे. “आम्ही काही स्वयंसेवकांवर कोरोना लसीची चाचणी केली. ही चाचणी यशस्वी ठरली आहे”, असं सेकनोफ युनिव्हर्सिटीकडून सांगण्यात आलं आहे (Russia claims worlds first corona vaccines human trial success).

रशियाची प्रसिद्ध वृत्तसंस्था ‘तास’ने याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय भारतातील रशियाच्या दुतावासातील अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट याबाबत माहिती देत जगातील ही पहिली यशस्वी लस असल्याचं म्हटलं आहे (Russia claims worlds first corona vaccines human trial success).

सेकनोफ युनिव्हर्सिटीच्या क्लिनिकल रिचर्सच्या प्रमुख इलिना स्मोलयारचुक यांनी ‘तास’ला प्रतिक्रिया दिली. “ही लस प्रभावशाली आहे. लसीचं संशोधन पूर्ण झालं असून हे औषध पूर्णपणे सुरक्षित आहे”, असं इलिना स्मोलयारचुक म्हणाल्या.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“ज्या स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली त्यांना 15 ते 20 जुलैपर्यंत डिस्चार्ज देण्यात येईल. डिस्चार्जनंतर सर्वांना निगराणीखाली ठेवण्यात येईल”, अशी माहिती इलिना यांनी दिली. “सर्वात आधी 18 जून रोजी 18 जणांवर या लसीची चाचणी केली. त्यानंतर 23 जून रोजी आणखी काही स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी करण्यात आली होती”, अशी माहितीदेखीस इलिना स्मोलयारचुक यांनी दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर लस तयार करण्यासाठी हजारो वैज्ञानिक आणि संशोधक काम करत आहे. जगातील बहुतेक देश लसीचं काम करत आहेत. जगभरात 100 पेक्षा जास्त वैज्ञानिक संस्था या कामात अहोरात्र मेहमत घेत आहेत. भारतातही अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करत आहेत. दरम्यान, रशियाने केलेला दावा खरा ठरला तर संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *