AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : चेर्नोबिलमध्ये रशियाच्या हल्ल्यात घरे, रस्ते, पूल सर्वकाही नष्ट, 480 क्षेपणास्त्रे डागली; मृत्यूचे तांडव !

युक्रेनच्या अधिकार्‍यांनी दावा केला आहे की हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासून रशियाने 480 क्षेपणास्त्रे डागली आहेत आणि युक्रेनच्या संरक्षण यंत्रणेने त्यापैकी अनेक क्षेपणास्त्रे पाडली आहेत. या युद्धात आतापर्यंत २२७ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे. तर ५२५ जखमी आहेत.

Video : चेर्नोबिलमध्ये रशियाच्या हल्ल्यात घरे, रस्ते, पूल सर्वकाही नष्ट, 480 क्षेपणास्त्रे डागली; मृत्यूचे तांडव !
हल्ल्यानंतर लागलेली आग Image Credit source: ANI
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 04, 2022 | 1:07 PM
Share

रशियाच्या (rassia) हल्ल्याला आज 9 दिवस पुर्ण होत असून रशियाकडून हल्ल्याची तीव्रता वाढली असल्याची पाहायला मिळत आहे. रशियाने मागच्या 8 दिवसात कीव (keiv) आणि खारकीव मधील अनेक महत्त्वाची स्थळ उद्ववस्त केल्यानंतर आता चेर्नोबिलमध्ये (chernihiv) हल्ला करायला सुरूवात केली आहे. युक्रेनमधील दिलेल्या मीडियाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत तिथं रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण जखमी झाले आहेत. युक्रेनने हा हल्ला रहिवासी परिसरात केला असल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या अधिकार्‍यांनी दावा केला आहे की हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासून रशियाने 480 क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यापैकी युक्रेनच्या संरक्षण यंत्रणेने त्यापैकी अनेक क्षेपणास्त्रे पाडली असल्याचा दावा केला आहे. शियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 2000 नागरिक मारले असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. त्यामुळं युक्रेनमध्ये किती भयानक परिस्थिती असेल हे आपण व्हिडीओच्या माध्यमातून पाहतोय.

काही तासाच चेर्नहिव्ह उद्वस्त

मागच्या 8 दिवसात हल्ल्याची तीव्रता कमी होती. परंतु सध्याची तिथली परिस्थिती पाहता हा हल्ला एकदम भयानक असल्याचं पाहायला मिळतंय. चेर्नहिव्हमध्ये घरे, रस्ते, पुल सगळ काही उद्वस्त केल्याचं पाहायला मिळत आहे. त्या परिसरात रशियाकडून जोरदार हल्ला होत असल्याने स्मशान शांतता पसरली आहे. चेर्नोबिलमध्ये रशियाकडून वास्तव करीत असलेल्या परिसरात हल्ला केल्याने 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 जण जखमी झाले आहेत. त्यामुळं तिथं राहत असलेली लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. चेर्नहिव्हमध्ये हल्ला केल्यानंतर तिथले काही फोटो व्हायरल झाले आहेत.

युरोपच्या सगळ्यात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटवरती हल्ला

सध्या रशियाने केलेल्या हल्ल्यात युरोपच्या सगळ्यात मोठ्या न्यूक्लिअर प्लांटवरती हल्ला केला आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर प्लांटमधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर तिथं धुराचे लोढे दिसत आहेत. त्यामुळे त्याला आग लागली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता युक्रेनला मिळणारी 25 टक्के लाईट आता गायब होईल. या प्लांटमधून युक्रेनमध्ये 25 टक्के वीज देण्यात येत होती. तिथल्या एका स्थानिक अधिका-याने युक्रेनच्या मीडियाला सांगितलं आहे की, आग विझवण अत्यंत गरजेचं आहे.

2000 लोकांचा मृत्यू झाल्याचा युक्रेनचा दावा

युक्रेनच्या अधिकार्‍यांनी दावा केला आहे की हल्ल्याच्या पहिल्या दिवसापासून रशियाने 480 क्षेपणास्त्रे डागली आहेत आणि युक्रेनच्या संरक्षण यंत्रणेने त्यापैकी अनेक क्षेपणास्त्रे पाडली आहेत. या युद्धात आतापर्यंत २२७ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे. तर ५२५ जखमी आहेत. त्याच वेळी, युक्रेनचे म्हणणे आहे की रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 2000 नागरिक मारले गेले आहेत. रशियाने सुध्दा पहिल्यांदा सैनिकांच्या मृत्यूची आकडेवारी जाहीर केली आहे. ते म्हणतात की आत्तापर्यंत झालेल्या युद्धात 500 सैनिक मारले गेले आहेत, त्याचबरोबर 1600 सैनिक जखमी झाले आहेत.

OBC Reservation: तर ओबीसींना कधीच आरक्षण मिळणार नाही, फडणवीसांनी सभागृहात भीती बोलून दाखवली

तुमचा ‘वाचवा’ शब्द आहे, तो ‘बुडवा’ होईल असं करू नका; भुजबळांचे फडणवीसांना शेलके आवाहन

Ukraine crisis : शेअर बाजार कोसळला, कच्च्या तेलाचे दर गेल्या 8 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर, सोनंही महागलं

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली