तुमचा ‘वाचवा’ शब्द आहे, तो ‘बुडवा’ होईल असं करू नका; भुजबळांचे फडणवीसांना शेलके आवाहन

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, फडणवीसजी यांनी काल सुप्रीम कोर्टात काय झालं, त्यावर आपलं मत मांडलं. त्यांचं स्वागत करतो. ओबीसींच्या पाठीमागे मजबुतीनं उभे आहात, ही चांगली बाब आहे. म्हणून भाजपच्या एका भगिनीनं ओबीसी वाचवा टोपी घालून दिली, मी ती लगेचच घातली.

तुमचा 'वाचवा' शब्द आहे, तो 'बुडवा' होईल असं करू नका; भुजबळांचे फडणवीसांना शेलके आवाहन
छगन भुजबळ.
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 11:45 AM

मुंबईः ओबीसी (OBC) आरक्षणावर तुमचा ‘वाचवा’ शब्द आहे. तो ‘बुडवा’ होईल, असं काही करू नका, अशा शेलक्या शब्दांत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विधिमंडळात आवाहन केले. अन् सभागृहाचा नूर पालटून गेला. भुजबळांनी मोजकेच शब्द फेकून सर्वांना सोबत तर घेतलेच. मात्र, गरज पडेल तिथे कानपिचक्याही दिल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या सुनावणीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला जोरदार धक्का बसला आहे. त्यावरूनच आज विधिमंडळात चर्चेच्या फैरी झडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी सर्व चर्चा रद्द करून फक्त ओबीसी आरक्षणावर मार्ग काढा, असे आवाहन केले. हाच मुद्दा धरत मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी केली.

काही चुका मान्य…

भुजबळ म्हणाले, काही नगरपालिका ओव्हरड्यू झाल्यात. मात्र, एकही झेडपी ओव्हरड्यू झाली नाही. फडणवीसांची तुम्ही दोघं तिघं आणि आमच्याकडे एक-दोन लोकं मिळून यावर काम करुयात. काही गोष्टी राहून गेल्या. त्या मी मान्यही केल्या. टेक्निकल गोष्ट राहून गेल्या. तारीख वगैरे. मी मान्य करतो. सुप्रीम कोर्टाचा आदर करतो. आम्ही सभागृहात एकमेकांवर चिखलफेक करणार नाही, उणीदुणी करणार नाही. आपण ओबीसी आरक्षणासाठी एक आहोत, हे देशाला दाखवून देऊ.

तुमच्यासारखा समजूदार नेता…

तुमच्यासारखा समजूतदार नेता असताना यात काय अडचण येईल, असं मला वाटत नाही. एकमेकांमध्ये दुरी निर्माण करण्याऐवजी, भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि हा विषय सोडवू. कोण कुठं काय काय बोललं हे सगळं माझ्याकडे आहे. पण मला असं वाटतं की आपण शांतपणे बसून यावर मार्ग काढला पाहिजे. केवळ दुरावा निर्माण करण्याचा तुमचा वाचवा हा शब्द आहे. तो बुडवा हा शब्द होईल असं करू नका, असे आवाहन त्यांनी फडणवीसांना केले.

म्हणूनच भाजपची टोपी घातली…

भुजबळ म्हणाले की, फडणवीसजी यांनी काल सुप्रीम कोर्टात काय झालं, त्यावर आपलं मत मांडलं. त्यांचं स्वागत करतो. ओबीसींच्या पाठीमागे मजबुतीनं उभे आहात, ही चांगली बाब आहे. म्हणून भाजपच्या एका भगिनीनं ओबीसी वाचवा टोपी घालून दिली, मी ती लगेचच घातली. खासदार विल्सन तामिळनाडूचे. त्यांच्या संदर्भातला उल्लेख कोर्टानं केला. त्यांनी सांगितलं की, अशा अमेंडमेन्ड ज्या पार्लमेंटमध्ये झालेल्या आहेत. राजकीयदृष्ट्या आरक्षण देण्याचा निर्णय मान्य केलाय. ओबीसींना आरक्षण द्यावं, असे कबूल केलंय. मात्र, या डाटाची स्क्रुटनी आम्ही नाही करु शकत, असं कोर्टानं म्हटल्याचंही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्याः

अर्थमंत्री विरुद्ध ऊर्जामंत्री वादाचा 2 लाख 50 हजार उद्योजकांना फटका, या अधिवेशनात तरी तोडगा निघणार का?

नाशिकचे संमेलन फक्त भुजबळांचे, पंचतारांकितच्या भपक्यात धोरणाचा बळी; ठाले-पाटलांचे ताशेरे

युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही, पंतप्रधानांशी बोलणार; मंत्री देशमुखांची ग्वाही

Non Stop LIVE Update
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.