रशियाची कोरोना लस Sputnik V भारतात येण्यास वेळ लागण्याची शक्यता, नेमकं कारण काय?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीलादेखील कोरोना लस देण्यात आली आहे. ही लस कोरोनावर परिनामकारक ठरली तर भारतात कधी येईल? या लसीची किंमत किती असेल? असे प्रश्न अनेकांना पडत आहेत (Russia Corona Vaccine).

रशियाची कोरोना लस Sputnik V भारतात येण्यास वेळ लागण्याची शक्यता, नेमकं कारण काय?

मुंबई : रशियाने कोरोना लस शोधल्याचा दावा केला आहे (Russia Corona Vaccine). या लसीचं Sputnik V असं नाव आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीलादेखील ही लस देण्यात आली आहे. ही लस कोरोनावर परिनामकारक ठरली तर भारतात कधी येईल? या लसीची किंमत किती असेल? असे प्रश्न अनेकांना पडत आहेत.

रशियाच्या कोरोना लसीची किंमत अजून ठरवण्यात आलेली नाही. तसेच ही लस भारतात लवकर येण्याची शक्यता कमी आहे. त्यामागे दोन मुख्य कारणं आहेत (Russia Corona Vaccine).

1) रशियाच्या कोरोना लसीवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित

रशियातील मॉस्को गमेलिया इन्स्टिट्यूटने कोरोना लस तयार केली आहे. मात्र, या लसीवर काही देशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळेच रशियाने अंतिम टप्प्यातील चाचणी करण्यापूर्वीच लसीची नोंदणी केली. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने रशियाने कोरोना लसीच्या चाचणीचे आकडे सांगितले नसल्याचं म्हटलं आहे.

2) भारताचा लसीबाबत रशियासोबत अद्याप कोणताही करार नाही

रशिया किंवा इतर कुठल्याही देशाची लस भारतात आणण्याची जबाबदारी सेंट्रल ड्रग्स स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशनचं असते. भारतातील नागरिकांवर लसीची चाचणी केल्यानंतरच लस अधिकृतपणे भारतात लॉन्च केली जाते. सेंट्रल ड्रग्स स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन रशियाला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी सांगू शकतं. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने जी लस तयार केली आहे तिची अशाचप्रकारे भारतात चाचणी होणार आहे. ही चाचणी पुढच्या आठवड्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे.

सेंट्रल ड्रग्स स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन आणीबाणीच्या परिस्थितीचा दाखला देऊन अंतिम टप्प्यातील चाचणी अपूर्ण राहिलेल्या लसदेखील भारतात आणू शकतं. पण तरीही तशा परिस्थितीत भारतात रशियाची लस आणली जाण्याची शक्यता कमी आहे. एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनीदेखील रशियाच्या लसीबाबत साशंकता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर रशियाच्या लसीबाबत भारताचा अद्याप कोणताही करार झालेला नाही.

लसीच्या निर्मितीत भारताचं मोठं नाव आहे. कोणत्याही आजारावरील लसीचं 50 टक्के उत्पादन भारतातचं होतं. जसं की ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची जबाबदारी भारताच्या सीरम कंपनीने घेतली आहे. ही लस यशस्वी झाली तर भारताला मोठा फायदा होईल. लस भारतातच तयार होईल आणि भारतीयांनाच मिळेल. सीरम कंपनीचे संचालक अदार पूनावाला यांनी याअगोदरच याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सीरममध्ये तयार होणाऱ्या 50 टक्के कोरोना लसी भारतीयांसाठीच असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : रशियाच्या राष्ट्रपतींनी स्वत:च्या मुलीलाच कोरोना लस टोचली, अमेरिका-ब्रिटनला लसीवर शंका

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *