AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Covid Updates: रशियामध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक; एकूण 2.32 लाख मृत्यू, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे काय नवे आदेश? 

कोविड संक्रमणाच्या वाढीमुळे रशिया सरकारने या आठवड्यापासून बहुतेक रशियन लोकांना काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रशियाच्या कोरोनाव्हायरस टास्क फोर्सने, मंगळवारी 24 तासांत 1,106 मृत्यूची नोंद केली आहे. हा मृत्यूचा आकडा रशियामध्ये कोविड महामारी सुरुवात झाल्यापासूनचा सर्वात जास्त आहे.

Russia Covid Updates: रशियामध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक; एकूण 2.32 लाख मृत्यू, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे काय नवे आदेश? 
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 11:56 AM
Share

मॉस्को: रशियामध्ये कोरोना वायरसचा पुन्हा एकदा उद्रेक पाहायला मिळतोय. मागील काही दिवसांपासून रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. रशियामध्ये दररोज 36 हजार पेक्षा जास्त नवीन कोविड रूग्णांची नोंद होतेय, जी गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडी कमी आहेत. मात्र, मंगळवारी मृत्यूंच्या दैनिक संख्या दुसरा उच्चांक गाठला आहे. (Russia Covid cases and deaths hits new high, Putin orders one week holiday)

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे काय नवे आदेश?

कोविड संक्रमणाच्या वाढीमुळे रशिया सरकारने या आठवड्यापासून बहुतेक रशियन लोकांना काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रशियाच्या कोरोनाव्हायरस टास्क फोर्सने, मंगळवारी 24 तासांत 1,106 मृत्यूची नोंद केली आहे. हा मृत्यूचा आकडा रशियामध्ये कोविड महामारी सुरुवात झाल्यापासूनचा सर्वात जास्त आहे. रशियामध्ये एकूण मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2,32,775 वर पोहचली, जी युरोपमधील आतापर्यंतची सर्वात मोठी आहे. व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत काम न करण्याचा आदेश दिला आहे आणि सुट्टी जाहीर केली आहे.

या काळात, बहुतेक राज्य संस्था आणि खाजगी व्यवसाय ऑपरेशन्स बंद राहतील. बहुतेक स्टोअर, शाळा, जिम आणि बहुतेक मनोरंजन स्थळांसही बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट आणि कॅफे फक्त टेकआउट किंवा डिलिव्हरी ऑर्डरसाठी खुले असतील. फूड स्टोअर्स, फार्मसी आणि मुख्य पायाभूत सुविधा चालवणारे व्यवसाय चालू राहू शकतात, असे आदेश देण्यात आले आहेत.

लसीकरणाचा वेग कमी

रशियात कोविडविरोधी लसीकरणाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी आहे. एकूण 14.6 कोटी लोकसंख्येपैकी आतापर्यंत फक्त 4.5 कोटी (32 टक्के) पूर्ण लसीकरण झाले आहे. लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे संसर्ग जास्त आहे, आसं म्हटले जात आहे. कोविड -19 ची लस सरकार देशभर पुरवत आहे, पण तरीही लोक त्यातून माघार घेत आहेत. ऑगस्टमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील 52 टक्के लोकसंख्येला लसीकरणामध्ये रस नाही. राष्ट्रपती पुतीन यांनी अनेक वेळा लसीकरणाचे आवाहन केले असताना ही परिस्थिती आहे.

इतर बातम्या

China locksdown Lanzhou: चीनमध्ये कोरोनाचा हाहा:कार! लांझोउ शहरात लॉकडाऊन

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया क्रुझवर होता, तो वानखेडेंचा मित्र, त्यानं माल विकला, नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप

राज्यानंतर केंद्राचीही नुकसानभरपाई, कशी होते रक्कम खात्यामध्ये जमा ?

Russia Covid cases and deaths hits new high, Putin orders one week holiday

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....