राज्यानंतर केंद्राचीही नुकसानभरपाई, कशी होते रक्कम खात्यामध्ये जमा ?

खरीपातील नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना आधार होता तो नुकसानभरपाईचा. अखेर राज्य सरकारने त्यांच्या हिस्स्याची रक्कम जमा केल्यानंतर आता केंद्र सरकारनेही पहिल्या हप्त्यापोटी 899 कोटी रुपये हे विमा कंपन्यांकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाईचा मार्ग हा मोकळा झाला असून दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यानंतर केंद्राचीही नुकसानभरपाई, कशी होते रक्कम खात्यामध्ये जमा ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 10:47 AM

लातूर : खरीपातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना आधार होता तो नुकसानभरपाईचा. (Crop Insurance Scheme, ) अखेर राज्य सरकारने त्यांच्या हिस्स्याची रक्कम जमा केल्यानंतर आता केंद्र सरकारनेही पहिल्या हप्त्यापोटी 899 कोटी रुपये हे विमा कंपन्यांकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे (Compensation to Farmers) नुकसानभरपाईचा मार्ग हा मोकळा झाला असून दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यावर ही रक्कम जमा होणार हे देखील माहिती असणे आवश्यक आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी असेलल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे येत्या काही दिवसांध्येच खरीपातील पिकांच्या नुकसानीपोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पावसामुळ पिकाचे तर नुकासान झाले होते. शिवाय बाजारामध्येही पिकांना समाधानकारक दर मिळत नव्हता. शिवाय दिवसेंदिवस सोयाबीनचे दर हे घसरत होते. त्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी आणि दिवाळीसाठी ही नुकसानभरपाईची मदत शेतकऱ्यांच्या कामी येणार आहे.

केंद्राचा 899 कोटींचा पहिला हप्ता

गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारकडील विम्याचा हप्ता केव्हा विमा कंपनीकडे वर्ग होणार हा प्रश्न होता. मात्र, अखेर 899 कोटी रुपयांचा हप्ता हा सहा विमा कंपन्यांकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या रकमेचा आधार मिळणार आहे. हा पहिलाच हप्ता असून विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल असे नाही. तर कोणत्या जिल्ह्यासाठी ही रक्कम अदा करायची यावर विमा कंपन्या ह्या विचारधीन आहेत. मात्र, रखडेला केंद्रकडील हप्ता विमा कंपन्याना मिळाल्याने मदतीचा मार्ग सुखकर झाला आहे.

पूर्वसूचनांची संख्या 34 लाखावर मान्यता केवळ 8 लाख शेतकऱ्यांना

खरीप हंगामातील पीक नुकसानीपोटी राज्यातील शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या पूर्वसूचनांची संख्या आता 34.52 लाख झाली आहे. यातील 8.4 लाख शेतकऱ्यांच्या दाव्यांचे प्रस्ताव आतापर्यंत मान्य करण्यात आलेले आहे. अद्यापही लाखो शेतकऱ्यांच्या पूर्वसूचनांवर पंचनामे होण्याची प्रक्रीया प्रलंबित आहे. मात्र, कृषी आयुक्तांनी याचा आढावा घेतला असून लवकरच भरपाईचा लाभ शेतकऱ्यांना देण्याबाबत सुचना केल्या आहेत.

अशाप्रकारे विमा कंपन्यांना निधीचे विवरण

रिलायन्स 165.58 कोटी इफ्को 161.99 कोटी एचडीएफसी 116.20 कोटी भारती एक्सा 92.24 कोटी बजाज अलायन्स 107.62 कोटी भारतीय कृषी विमा कंपनी 254.92 कोटी

राज्य सरकारचा 993 कोटींचा हप्ता

राज्य सरकारने नुकसानभरपाईसाठी 10 हजार कोटींची घोषणा ही केलेली आहे. तर विमा कंपन्याना पहिला हप्ता म्हणून 993 कोटी रुपये अदा केले आहेत. राज्य सरकारने पैसे अदा करुनही केंद्र सरकारचा हप्ता वर्ग न झाल्याने प्रक्रीया ही रखडली होती. अखेर केंद्रानेही आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता वर्ग केला आहे. त्यामुळे दिवाळपपूर्वी काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे संकेत राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी देले आहेत. शिवाय केंद्राकडील निधीसाठी पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांनो ही काळजी घ्या

आता नुकसानभरपाई जमा होणार म्हणजे नेमकी कुठे ? हा प्रश्न अनेक अशिक्षित शेतकऱ्यांना पडलेला असतो. मात्र, शेतकऱ्यांनो ही रक्कम तुम्ही पीक विमा भरताना ज्या बॅंकेचा खाते क्रमांक फॅार्मवर दिलेला आहे त्याच खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. शिवाय तुम्ही दिलेल्या मोबाईलवर क्रमांकावर तसा मॅसेजही येणार आहे. शिवाय ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी सांगितले आहे. (Central government’s first instalment of crop compensation deposited to insurance companies, support to farmers)

संबंधित बातम्या :

कपाशीची वेचणी तर झाली पण, अद्याप खरेदी नाही, वाशिममधील कापूस उत्पादक शेतकरी संकटात

कोकणात वाढणार काजूचे उत्पादन, राज्य सरकारकडून अल्प व्याजदरात कर्ज

निसर्गाचा कहर त्यात बियाणे कंपनीकडून फसवणूक, 2 एकरावरील फुलकोबीवर फिरवला रोटर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.