ज्यानं भारताला आधार दिला तोच आता…अमेरिकेमुळं सर्वात मोठं संकट; पेट्रोल-डिझेलमुळे झोप उडाली!
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात अमेरिकेने रशियाची कोंडी केली होती. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने रशियन कच्च्या तेलावर निर्बंध लागू केले होते. परिणामी भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यावर निर्बंध आले होते. रशिया भारताला कमी किमतीत कच्चे तेल देतो.

India Petrol Diesel Crisis : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजीची किंमत वाढली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळेच भारतावर हे संकट ओढावले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याने अमेरिकेने रशियन कच्च्या तेलाच्या आयातीवरील निर्बंध शिथील केले होते. परंतु आता त्याची मुदत संपली आहे. विशेष म्हणजे ही मुदत वाढवण्याची अमेरिकेची मानसिकता नाही. त्यामुळेच आता परिस्थिती जास्तच बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रशियन कच्च्या तेलावरील निर्बंध पुन्हा लागू होण्याची शक्यता असल्याने आता भारतात पेट्रोल, डिझेलचा भाव आणखी भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेने हटवले होते निर्बंध आता परत…
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात अमेरिकेने रशियाची कोंडी केली होती. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने रशियन कच्च्या तेलावर निर्बंध लागू केले होते. परिणामी भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यावर निर्बंध आले होते. रशिया भारताला कमी किमतीत कच्चे तेल देतो. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात देशाचे हित लत्रात घेऊन भारताने त्या काळात रशियाकडून मोठ्या प्रमाणात कमी किमतीत कच्चे तेल खरेदी केले होते. परंतु अमेरिकेने रशियाच्या कच्च्या तेलाच्या निर्बंधांमुळे भारताला आपली गरज भागवण्यासाठी अन्य देशांकडून कच्चे तेल खरेदी करावे लागले होते. त्यानंतर अमेरिका-इराण युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला. म्हणूनच अमेरिकेने रशियाच्या कच्च्या तेलावरील निर्बंध तात्पुरत्या स्वरुपात हटवले होते.
उर्जासंकट होणार आणखी गडद
अमेरिकेने हटवलेल्या या निर्बंधांची मुदत ही 17 मे 2026 पर्यंत होती. आता हीच मुदत संपली असून अमेरिका ही मुदत वाढवण्याची शक्यता नाही. परिणामी आता अगोदरच वाढलेले उर्जासंकट आणखी गडद होऊ शकते, असे म्हटले जात आहे. ही शक्यता खरी ठरली तर भविष्यात या उर्जासंकटाचा परिणाम सामान्यांवर पडू शकतो.