AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरले! रशियाचा मोठा हल्ला, क्षेपणास्तांसह ड्रोन हल्ला, अणु तळांवर थेट…

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध टोकाला पोहोचले असून जगापुढे मोठे संकट उभे आहे. अमेरिकेकडून युक्रेनला या युद्धासाठी मदत केली जात असल्याचा आरोप सुरूवातीपासूनच केला जातोय. त्यामध्येच आता मोठा हल्ला करण्यात आला आहे.

जग हादरले! रशियाचा मोठा हल्ला, क्षेपणास्तांसह ड्रोन हल्ला, अणु तळांवर थेट...
Russia attack
| Updated on: Nov 09, 2025 | 11:53 AM
Share

गेल्या काही वर्षांपासून रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाची झळ जवळपास सर्व देशांना बसतंय. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने हे युद्ध अधिक सुरू असल्याचा आरोप करत अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, अशी मागणी अमेरिका करत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. दोन्ही देशांच्या सैन्याने एकमेकांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेने हे युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमेरिकेवर रशियाने गंभीर आरोप करत म्हटले की, आम्ही फक्त रशियासोबतच नाही तर पूर्ण नाटो देशांसोबत युद्ध लढत आहोत.

अमेरिकेकडून युक्रेनला या युद्धासाठी मदत केली जात असल्याचा आरोप सुरूवातीपासूनच केला जातोय. दोन्ही देशांमधील युद्ध टोकाला पोहोचले आहे. रशियाने शुक्रवारी रात्री ते शनिवार सकाळपर्यंत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला केला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियन हल्ल्यात खमेलनित्स्की आणि रिव्हने या दोन अणुऊर्जा प्रकल्पांना वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनना टार्गेट करण्यात आले आणि मोठे नुकसान झाले.

रशियाने केलेल्या हल्ल्याबद्दल बोलताना परराष्ट्र मंत्री आंद्रेई त्सिबिहा यांनी म्हटले की, मुळात म्हणजे हे हल्ले चुकून झालेली नाहीत. रशियाने जाणूनबुजून युरोपमधील अणु सुरक्षा धोक्यात आणली. या हल्ल्यांमध्ये सात लोक ठार झाले आणि अनेक गंभीर जखमी आहेत. पंतप्रधान युलिया स्वीरिडेन्को म्हणाले, या हल्ल्यांमुळे कीव, पोल्टावा आणि खार्किव्हच्या ऊर्जा पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.

हजारो घरांना वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे. या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले. पोल्टावा अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाणी पुरवण्यासाठी पॉवर जनरेटरचा वापर केला जात आहे. राज्य ऊर्जा कंपनी त्सेंट्रेनेर्गोने फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे वर्णन केले आहे. पहिल्यादाच रशियाने अशाप्रकारचा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. आता रशियाच्या या मोठ्या हल्ल्यानंतर अमेरिका नेमकी काय भूमिका घेते, याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.