लठ्ठ आणि मधुमेहींना अमेरिकेत मिळणार नाही प्रवेश, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा धक्कादायक निर्णय, व्हिसा…
डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून व्हिसाबाबत धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. H-1B व्हिसानंतर त्यांनी आता ग्रीन कार्डबद्दल हैराण करणारा निर्णय घेतला. ज्यानंतर आता मोठी खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. त्यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. भारतीय लोक मोठ्या संख्येत अमेरिकेत H-1B व्हिसावर जाऊन नोकऱ्या करतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला. व्हिसावरील शुल्क वाढून 88 लाख केले. आता H-1B व्हिसा मिळवण्यासाठी 88 लाख रूपये मोजावी लागणार आहेत. हा मोठा धक्काच भारतीयांना आहे. H-1B व्हिसाच्या नियमातील बदलानंतर डोनाल्ड ट्रम्प सरकारने ग्रीन कार्डबदलचाही नियम बदलला आहे. जर तुम्हाला मधुमेहासारखी काही आजार असतील तर तुम्हाला अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही. डोनाल्ड ट्रम्प सरकार मागील काही दिवसांपासून सतत व्हिसाच्या नियमात बदल करताना दिसत आहे. H-1B व्हिसामुळे लोक अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या करत असल्याने अमेरितील लोकांना नोकऱ्या मिळत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.
अमेरिकेतील लोक आमच्यासाठी प्रथम प्राधान्य असल्याचे त्यांनी म्हटले. फक्त हेच नाही तर अमेरिकेतील लोकांच्या किती जास्त प्रमाणात नोकऱ्या जात असल्याची त्यांनी आकडेवारी जाहीर केली. आता अमेरिकेत जाऊन नोकरी करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. आता त्यांनी अमेरिकेतील ग्रीन कार्डच्या नियमात देखील मोठा बदल करत मधुमेहासारखी आजार असलेल्या लोकांना ग्रीन कार्ड नाकारले जाऊ शकते.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून सरकारी निर्देश देत सांगण्यात आले की, अमेरिकेत व्हिजासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला वजनाची समस्या किंवा मधुमेहासारख्या आरोग्य समस्या असतील तर त्याला व्हिसा नाकारला जाऊ शकतो. विदेश मंत्रालयाने सर्व दूतावासांना एक संदेश पाठवला असून त्यामध्ये स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, आजारी लोकांना अमेरिकेत प्रवेश दिला तर ते ओझे बनतील.
अमेरिकेतील संसाधन खराब करू शकतात. लठ्ठपणा, हदयरोग, श्वनाच्या समस्या, कॅन्सर, मधुमेह, मेटाबॉलिक डिसऑर्डर आणि मानसिक रोग या रोगांचा उल्लेख करण्यात आला. त्यांचे म्हणणे आहे की, अशा आजाराने ग्रस्त लोकांना अमेरिकेत प्रवेश दिला तर त्यांच्यावर लाखो डॉलर खर्च होतील. काहीही करून डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेत येणाऱ्या लोकांची संख्या कमी करायची हे यावरून स्पष्ट होते.
