AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाचा पाकिस्तानला मोठा झटका, थेट केली कारवाई, पाकने थेट भारताच्या…

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेमुळे भारत आणि रशियाचे संबंध एका वेगळ्या वळणावर आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता भारतावर प्रचं दबाव अमेरिकेचा आहे. त्यामध्येच आता पाकिस्तानवर मोठी कारवाई रशियाने केली आहे.

रशियाचा पाकिस्तानला मोठा झटका, थेट केली कारवाई, पाकने थेट भारताच्या...
Russia
| Updated on: Nov 10, 2025 | 1:36 PM
Share

पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंडावर पडला. रशियाने थेट कारवाई केली. रशियाने नुकताच पाकिस्तानच्या ISI गुप्तचराला अटक केली. आयएसआयचे गुप्तचर नेटवर्क उघड केले आहे. चक्क हे नेटवर्क  रशियाकडून S-400 आणि हेलिकॉप्टर तंत्रज्ञानासारख्या प्रगत हवाई संरक्षण प्रणाली चोरण्याचा प्रयत्न करत होते. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रशियाची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू होती. यादरम्यान पाकिस्तानच्या एकाही विमानाला भारताच्या हद्दीमध्ये S-400 या रशियाच्या क्षेपणास्त्राने प्रवेश करू दिला नाही आणि पाकिस्तानला मोठा झटका दिला. जोरदार उत्तर S-400 ने पाकिस्तानला दिला. भारतीय हवाई दलाच्या आधुनिक संरक्षण प्रणालीचा भाग S-400 आहे.

रिपोर्टनुसार, रशियन गुप्तचर संस्थांनी सेंट पीटर्सबर्गमध्ये आयएसआयसाठी काम करणाऱ्या एका रशियन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडे काही गुप्त कागदपत्रे आढळली आहेत. विशेष म्हणजे गुप्त कागदपत्रांची तस्करी होण्याच्या अगोदर त्याला अटक करण्यात आली. लष्करी हेलिकॉप्टर आणि हवाई संरक्षण प्रणालीच्या विकासात वापरले जाणारे कागदपत्रे जप्त करण्यात आली. ज्यामध्ये S-400  बद्दलही माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआय नेटवर्क रशियाच्या प्रगत S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीशी संबंधित माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय हवाई दलाकडे सध्या S-400 क्षेपणास्त्र प्रणालीच्या तीन युनिट्स आहेत. भारताकडून अजून S-400 क्षेपणास्त्र खरेदी करण्याची तयारी सुरू आहे. भारताच्या या अत्याधुनिक S-400 क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानची झोप उडाल्याचे स्पष्ट आहे.

रशियाकडून पाकिस्तान ज्याप्रकारे S-400 माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांनी हे प्रकरण खूप जास्त गांर्भियाने घेतले आहे. भारत आणि रशिया यांचे अनेक वर्षांचे चांगले संबंध सध्या एका वेगळ्या स्थितीमध्ये आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता भारतावर प्रचंड दबाव अमेरिकेचा आहे. हेच नाही तर भारतावर 50 टक्के टॅरिफही अमेरिकेने लावला आहे. मात्र, असे असले तरीही भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.