रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात येणार? झेलेन्स्की पुतिन यांना भेटण्यास तयार
रशिया-युक्रेन युद्धाचा शेवट जवळ आला आहे का? युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांनी रशियाच्या राष्ट्रपती पुतीन यांच्याशी या आठवड्यात तुर्कीत भेटण्यास होकार दिला आहे. हे युद्ध संपुष्टात आणण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असू शकते. या भेटीत शस्त्रसंधीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

रशिया युक्रेन युद्धासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. युद्धात अडकलेल्या रशिया आणि युक्रेनमध्ये शस्त्रसंधीबाबत काही तरी करार होण्याची शक्यता आहे. झेलेन्स्की यांनी रशियासोबत थेट बैठक घेण्याचे मान्य केले आहे. ही बैठक या आठवड्यात तुर्की येथे होण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना दुसरीकडे रशिया युक्रेन युद्ध कधीही संपुष्टात येऊ शकतं, असे संकेत सध्या मिळत आहेत. हे संकेत खुद्द झेलेन्स्की यांनीच दिले आहेत. त्यांनी थेट पुतिन यांना भेटणार असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही देशातील ही बैठक या आठवड्यात तुर्की येथे होण्याची शक्यता आहे.
गेल्या साडेतीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी आपले समकक्ष व्लादिमीर पुतिन यांची समोरासमोर भेट घेण्याचे मान्य केले आहे. या आठवड्यात तुर्कस्तानमध्ये दोघांची भेट होण्याची शक्यता आहे. ही बैठक घेण्यामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जात असून, त्यांनी झेलेन्स्की यांना पुतिन यांची भेट घेण्याचा आग्रह धरला होता.
मी पुतिन यांची वाट पाहणार…
CNN च्या वृत्तानुसार, झेलेन्स्की यांनी ‘X’ वर पोस्ट करत लिहिले की, “मी गुरुवारी तुर्कस्तानमध्ये पुतिन यांची वैयक्तिकरित्या वाट पाहणार आहे.” झेलेन्स्की म्हणाले की, सोमवारपासून पूर्ण आणि कायमस्वरूपी शस्त्रसंधी मुत्सद्देगिरीसाठी आवश्यक आधार प्रदान करेल, परंतु वाटाघाटींमध्ये सहभागी होण्यासाठी ही पूर्वअट असेल की नाही हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
CNN च्या वृत्तानुसार, झेलेन्स्की यांनी ‘X’ वर पोस्ट करत लिहिले की, “मी गुरुवारी तुर्कस्तानमध्ये पुतिन यांची वैयक्तिकरित्या वाट पाहणार आहे.” झेलेन्स्की म्हणाले की, सोमवारपासून पूर्ण आणि कायमस्वरूपी शस्त्रसंधी मुत्सद्देगिरीसाठी आवश्यक आधार प्रदान करेल, परंतु वाटाघाटींमध्ये सहभागी होण्यासाठी ही पूर्वअट असेल की नाही हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
पुतीन बिनशर्त शस्त्रसंधीसाठी सहमत होईपर्यंत थेट बैठक न घेण्यावर झेलेन्स्की ठाम होते. त्यांचे समर्थक, युरोपीय देशही या ओळीवर ठाम होते. युक्रेनची राजधानी कीव्ह येथे शनिवारी या देशांची बैठक झाली आणि पुतिन बिनशर्त शस्त्रसंधीवर सहमत होण्यापूर्वी पुढील कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असे सांगितले.
अल्टिमेटम स्वीकारला नाही
सोमवार, 12 मेपर्यंत युक्रेनबरोबर 30 दिवसांसाठी बिनशर्त शस्त्रसंधी जाहीर करा, अन्यथा नव्या निर्बंधांना सामोरे जा, असा अल्टिमेटम त्यांनी रशियाला दिला. पण पुतिन यांनी युक्रेन आणि इतर युरोपीय देशांचा हा अल्टिमेटम फेटाळून लावला. शस्त्रसंधीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करून त्यांनी गुरुवारी तुर्किये येथे झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला.
झेलेंस्कीचा सूर शिथिल
ट्रम्प यांनी पुतिन यांच्या निमंत्रणाचे समर्थन केले आणि झेलेंस्की यांच्यावर दबाव वाढवला आणि गुरुवारी रशियन अधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या बैठकीसाठी त्यांनी ताबडतोब सहमती दर्शवावी, असे सांगितले. जर्मनीचे नवे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी ट्रम्प यांच्या या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. झेलेन्स्की यांचा सूरही शिथिल झाला आणि त्यांनी या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्यास तयार असल्याचे जाहीर केले.
शस्त्रसंधीचे पहिले पाऊल
झेलेन्स्की लिहितात, “कोणतेही युद्ध संपवण्याची पहिली पायरी म्हणजे युद्धबंदी. मात्र, आम्ही पूर्ण आणि कायमस्वरूपी शस्त्रसंधीची वाट पाहत आहोत. जेणेकरून मुत्सद्देगिरीला आवश्यक आधार देता येईल. लोकांचे मृत्यू आणि हत्या अशा प्रकारे खेचण्यात अर्थ नाही. मला आशा आहे की यावेळी रशियनांना कोणतेही निमित्त सापडणार नाही. मी गुरुवारी तुर्कियेमध्ये पुतिन यांची वाट पाहणार आहे.
साडेतीन वर्षांपासून हे युद्ध सुरू
नाटोचा भाग होण्याच्या झेलेंस्कीच्या आग्रहामुळे संतापलेल्या रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर आक्रमण केले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच आहे. रशियाने आतापर्यंत युक्रेनच्या एकूण क्षेत्रफळाच्या 20 टक्के म्हणजे पूर्व भागावर ताबा मिळवला आहे. यापूर्वी 2014 मध्ये त्याने क्रिमियाचा भाग ताब्यात घेतला होता.
