डोनाल्ड ट्रम्प यांना 4000 वोल्टचा झटका, अमेरिकेचा थयथयाट, भारताने रशियासोबत मिळून थेट…
America Tariff : मागील काही वर्षात भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले राहिले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफनंतर हे संबंध चांगलेच ताणल्याचे बघायला मिळतंय. अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावूनही अमेरिकेच्या अटी भारताने मान्य केल्या नाहीत.

अमेरिकेने भारताने 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अनेक वर्षांचे चांगले संबंध ताणल्याचे सध्या बघायला मिळतंय. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच आपण टॅरिफ लावत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. टॅरिफच्या मुद्द्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध खराब झाले. हेच नाही तर व्यापार चर्चा देखील बंद आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले की, दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध आहेत. नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत आणि राहतील. पुढच्या आठवड्यामध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार चर्चा होईल. यादरम्यानच आता अमेरिकेने लादलेल्या टॅरिफनंतर रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री पात्रुशेव हे याच महिन्यात भारत दाैऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पात्रुशेव हे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश भारतातून कोळंबीची आयात आणि खतांचा पुरवठा वाढवणे हा आहे.
अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा सर्वाधिक फटका हा भारताच्या सीफूडला बसलाय. अमेरिकेत जाणारे जवळपास सर्वच सीफूड बंद झाले. त्यामध्येच आता रशियाचे उपपंतप्रधान भारत दाैऱ्यावर येणार आहेत. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच आपण टॅरिफ लावल्याचे अमेरिकेने अगोदरच मान्य केले. यासोबतच भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, आम्ही भारतावरील 50 टक्के टॅरिफ काढू असे अमेरिेकेने म्हटले आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि रशियाची जवळीकता अधिक वाढल्याचे बघायला मिळाले.
भारत हा अमेरिकेला कोळंबीचा सर्वात मोठा पुरवठादार आहे, परंतु अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर व्यापाराला मोठा फटका बसला आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की, रशिया भारतीय कोळंबी निर्यातदारांसाठी एक मोठी बाजारपेठ तयार करू शकतो. शिवाय व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान देखील यामाध्यमातून टाळता येईल. दिमित्री पात्रुशेव द्विपक्षीय व्यापार संबंध मजबूत करण्यासाठी भारतातील प्रमुख नेत्यांना भेटू शकतात.
अमेरिका ही भारतीय कोळंबीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, जिथे दरवर्षी अब्जावधी डॉलर्सचा व्यापार होतो. मात्र, 50 टक्के टॅरिफमुळे होणारी निर्यात आता एकदम कमी झाल्याचे त्याचे मुख्य कारण म्हणजे मिळणारा नफा फारच कमी झाला. त्यामुळेच भारताकडून हे नुकसान भरून काढण्यासाठी मार्ग शोधली जात आहेत. दुसरीकडे रशियाचे उपपंतप्रधान हे भारताच्या दाैऱ्यावर असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना हा मोठा झटका म्हणाला लागेल.
