जग हादरले! टॅरिफच्या वादात डोनाल्ड ट्रम्प थेट म्हणाले, ती एक मोठी चूकच…
America Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याने मोठा वादळ आले. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी भारताबद्दल वादग्रस्त विधान करत आहेत. भारताने देखील जोरदार उत्तर अमेरिकेला दिले. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक गोष्ट चूक असल्याचे म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. भारत हा रशियाकडून तेल खरेद करत असल्याने आपण हा टॅरिफ लावत असल्याचे त्यांनी म्हटले. आता शेवटी नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक गोष्ट चूक असल्याचे म्हटले आहे. फक्त हेच नाही तर त्यांनी मी यावर नाराज असल्याचेही म्हटले. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे काही सल्लागार भारताबद्दल वादग्रस्त विधाने करताना दिसत आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता वेगवेगळ्या पद्धतीने भारतावर दबाव टाकण्याचे काम सुरू होते. मात्र, भारताने अमेरिकेच्या अटी नाही म्हणजे नाहीच मान्य केल्या. भारत आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच मोठे विधान केले. रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाने अलीकडेच ड्रोनचा वापर करण्यात आला. मात्र, रशियाचे हे ड्रोन थेट पोलंडच्या हवाई क्षेत्रात घुसले. रशियाने पोलंडच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले. पोलंडने देखील रशियाचे ड्रोन दिसताच त्यांना पाडले. आता यावरच डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठे भाष्य केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांसोबत बोलताना म्हटले की, होय ही एक चूक असू शकते…पण जे घडले त्यावर मी नक्कीच खुश नाहीये. मला यासोबतच खरोखरच आशा आहे की, हे युद्ध लवकरच संपेल. मात्र, या बोलण्यात डोनाल्ड ट्रम्प हे थेट रशियाची बाजू घेताना दिसले. एकीकडे ते म्हणतात की, रशियाला मोठा टॅरिफ लावणार, रशियाला वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल आणि दुसरीकडे थेट रशियाची बाजू घेत आहेत.
ट्रम्प यांच्या विधानावर पोलंडनेही प्रतिक्रिया दिली आहे. पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री राडोस्लाव सिकोर्स्की यांनी सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, रशियन ड्रोनने आमच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्याला चूक म्हणणेज चुकीचे आहे. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. मात्र, रशियावर टॅरिफ लावण्याची हिंमत अमेरिकेने केली नाही. रशियाला फक्त आणि फक्त धमक्या दिल्या जात आहेत.
