खबरदार तुम्ही भारताला असे बोलू शकत नाहीत, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर संतापले पुतिन, थेट म्हणाले, मोठ्या अर्थव्यवस्थेला..
मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे भारताला धमकावताना दिसत आहेत. हेच नाही तर पुढील काही दिवसांमध्ये भारताला वाईट अनुभवांना सामोरे जावे लागेल आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील, असे थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आता पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकताच आता डोनाल्ड ट्रम्प यांची चांगलीच कानउघडणी केलीये. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दम देत शिष्टाचार शिकवला आहे. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा भारताबद्दल पूर्णपणे बदलली आहे. ते फक्त आणि फक्त भारताला धमकावण्याचे काम करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची ही भाषा कोणाच्याही पचनी पडत नाहीये. आता पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या याच भाषेवर अक्षेप घेऊन थेट म्हटले की, तुम्ही अशाप्रकारे भारत आणि चीनसोबत बोलू शकत नाहीत. पुतिन यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मुद्द्यावरून दबाव आणण्याचे काम करत आहेत.
व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले, डोनाल्ड ट्रम्प सरकारने आशियातील दोन सर्वात मोठ्या शक्तींना एकप्रकारे कमकुवत करण्याचे काम केले आहे आणि त्यांच्यावर दबाव टाकला जातोय. भारत आणि चीनवर टॅरिफ आकारणे म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा हा मोठा डाव आहे. भारतात आज जवळपास 1.5 अब्ज लोक राहतात आणि ही एक खूप शक्तीशाली मोठी अर्थव्यवस्था नक्कीच आहे. अशा इतक्या मोठ्या देशाला जर कोणी सांगत असेल की, तुम्हाला शिक्षा होणार तर त्याचा विचार देशातील नेतृत्वाला करावा लागतो.
या देशाने स्वतःच्या इतिहासात कठीण काळ अनुभवला आहे. पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले की, तुम्हाला जर व्यापार करायचा असेल आणि चांगले नाते ठेवायचे असतील तर अशी भाषा वापरता येणार नाही ती योग्य नाही. यासोबतच पुतिन यांनी विश्वास दाखवला की, समस्या लवकरच सुटतील आणि यामधून मार्ग हा नक्कीच निघेल. या देशाला कोणीही धमकावू शकत नाही, सर्वांना समान अधिकार असल्याचेही पुतिन यांनी म्हटले.
एक कोणताही देश इतर देशांना धमकावू शकत नाही, तसा अधिकार कोणाकडेही नाहीये. याबद्दल कोणीही बोलत नाही, ना ब्रिक्समध्ये, ना एससीओमध्ये. या बहुपक्षीय जगात सर्वांना समान अधिकार असले पाहिजेत. भारत आणि चीन दोन्ही देश अर्थिक शक्ती आहेत, असेही पुतिन यांनी म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारताला धमकावताना दिसले. मात्र, आता पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची चांगलीच कानउघडणी केल्याचे बघायला मिळतंय.
