AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Rushdie Attack : सलमान रश्दी यांचा जीव वाचला, पण एक डोळा निकामी होऊ शकतो; वाचा हेल्थ अपडेट

Salman Rushdie Attack : सलमान रश्दी यांच्यावर काल हा जीवघेणा हल्ला झाला. न्यूयॉर्कच्या चौटाउक्वा इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी रश्दी उभे राहिले होते. तेवढ्यात हादी मातर नावाचा एक तरुण स्टेजवर आला. त्याने अचानक रश्दी यांना ठोसे लगावण्यास सुरुवात केली. त्यानंतर...

Salman Rushdie Attack : सलमान रश्दी यांचा जीव वाचला, पण एक डोळा निकामी होऊ शकतो; वाचा हेल्थ अपडेट
सलमान रश्दी यांचा जीव वाचला, पण एक डोळा निकामी होऊ शकतो; वाचा हेल्थ अपडेट Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 2:56 PM

न्यूयॉर्क: आपल्या बेधडक लिखाणामुळे प्रसिद्ध असलेले जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie Attack) यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाला. रश्दी यांच्या मान आणि पोटावर गंभीर चाकूने सपासप वार करण्यात आले आहेत. हा हल्ला होताच रश्दी हे स्टेजवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दैव बलवत्तर म्हणून या जीवघेण्या हल्ल्यातून रश्दी वाचले आहेत. मात्र, त्यांचा एक डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता आहे. तशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी हादी मातर (Hadi Matar) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत असून हल्ल्यामागचं कारण समजून घेतलं जात आहे. न्यूयॉर्क पोलिसांसह (New York Police) एफबीआयकडूनही मातर याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, या हल्ल्लाचा जगभरातून निषेध नोंदवला जात आहे.

सलमान रश्दी यांच्यावर सर्जरी करण्यात आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या यकृतालाही मार लागला आहे. हल्ला अतिशय भीषण होता. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला जबर मार लागला आहे. त्यामुळे त्यांचा एक डोळा कायमचा निकामी होऊ शकतो, असं रॉयटर्सने म्हटलं आहे. रश्दी सध्या व्हेंटिलेटरवर आहेत, असं त्यांच्या निकटवर्तीयाने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

अन् अचानक चाकूने सपासप वार झाले

सलमान रश्दी यांच्यावर काल हा जीवघेणा हल्ला झाला. न्यूयॉर्कच्या चौटाउक्वा इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी रश्दी उभे राहिले होते. तेवढ्यात हादी मातर नावाचा एक तरुण स्टेजवर आला. त्याने अचानक रश्दी यांना ठोसे लगावण्यास सुरुवात केली. त्यानंतर चाकू काढून त्याने रश्दी यांच्यावर सपासप वार केले. रश्दी यांच्या मान, डोळा आणि पोटावर चाकूने सपासप वार करण्यात आल्याने रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या आणि रश्दी जागेवरच कोसळले. त्यांचे हात रक्ताने माखले होते. या हल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ माजली. त्यानंतर रश्दी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हल्लेखोर अमेरिकेचाच

या प्रकरणी पोलिसांनी हादी मातर या तरुणाला अटक केली आहे. तो अमेरिकेचाच रहिवासी असून इराणचा समर्थक आहे. त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्लाह खुमैनी यांचा फोटो आहे. रश्दी यांनी त्यांच्या द स्टॅनिक वर्सेज या पुस्तकातून इस्लामचा अपमान केला होता. तेव्हा खुमैनी यांनी रश्दी यांना मारण्याचा फतवा काढला होता. त्यानंतर रश्दी यांना तब्बल जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाल्याने जगभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रश्दी यांच्या या वादग्रस्त पुस्तकावर भारतासह अनेक देशात बंदी घातलेली आहे.

अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट
अजित पवारांनी घेतली कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची भेट.
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार
सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार.
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत
व्हायरल झालेल्या आजी-आजोबाशी खास बातचीत.
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितल कारण.
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं
गळा चिरून शेतात फेकलं, 14 वर्षीय मुलाच्या हत्येने जळगाव हादरलं.
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्..
किंचाळ्या, खिडक्यांना लटकलेले विद्यार्थी अन्...
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर
बीडमध्ये झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर.
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला
लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला.
कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग
कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग.