Israel Hamas War : इस्रायलच्या नांग्या ठेचल्या! स्पेनच्या एका निर्णयामुळे…नेतान्याहू काय निर्णय घेणार?
हमासला समूळ नष्ट करण्यासाठी इस्रायकडून मोठे हल्ले केले जात आहेत. मात्र आता स्पेन देशाने इस्रायलवर अनेक महत्त्वाचे निर्बंध लादले आहेत. त्यामुळे इस्रायलची चांगलीच अडचण झाली आहे.

Spain Cancels Trade With Isreal : सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात टोकाचे युद्ध चालू आहे. इस्रायलला समूळ नष्ट करण्यासाठी इस्रायली सैन्याकडून गाझामध्ये मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले जात आहेत. इस्रायचे प्रमुख बेंजामीन नेतान्याहू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत अजूनही मोहीम संपलेली नाही, असे थेट विधान केलेले आहे. त्यामुळेच इस्रायल सध्या युद्ध थांबवण्याच्या स्थितीत नसल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे हे युद्ध थांबावे यासाठी युरोपीयन तसेच इतर देशांकडून इस्रायलवर दबाव टाकला जात आहे. असे असतानाच आता स्पेनच्या एका निर्णयामुळे इस्रायल चांगलाच अडचणीत आला आहे. या निर्णयामुळे इस्रायलला आर्थिक पातळीवर मोठे नुकसान होणार आहे.
डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याचा करार रद्द केला
इस्रायलच्या हेकेखोर भूमिकेमुळे आतापर्यंत त्या देशाचे तब्बल एक अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. इस्रायल युद्ध थांबवत नसल्यामुळे आता या देशाचे सर्वच मित्रपक्ष त्याच्यापासून दूर जात आहेत. स्पेनने तर इस्रायलसोबतचा राफेल अॅडव्हानस डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याचा करारच रद्द करून टाकला आहे. हा करार रद्द होताच गेल्या काही महिन्यांत वेगवेगळ्या देशांनी इस्रायलच्या कंपन्यांशी साधारण 65.4 कोटी डॉलर्से वेगेगळे करार रद्द केल्याचे समोर आले आहे. यासह इस्रायलसोबतचे अब्जो डॉलर्सचे नवे करारही स्थगित करण्यात आले आहेत.
स्पेनने कोणकोणते करार रद्द केले?
स्पेनच्या या निर्णयामुळे आगामी काळात इतरही काही देश आपल्यासोबतचे शस्त्रनिर्मितीचे करार रद्द करतील, अशी भीती आता इस्रायच्या संरक्षण उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांना वाटत आहे. स्पेनने गेल्या आठवड्यात लाईटनिंग 5 टार्गेटिंग पॉड्सची खरेदी रद्द केली. या कराराचे मूल्य 21.8 कोटी डॉलर्सपेक्षा अधिक होते. त्यानंतर 15 कोटी पल्स रॉकेट सिस्टिम खरेदी करण्याचाही करार स्पेनने रद्द केला. या वर्षाच्या सुरुवातीला स्पेनने एल्बिट कंपनीच्या काही सहाय्यक कंपन्यांसोबत अनेक कोटी डॉलर्स मूल्य असणारे करारही रद्द करण्यात आले.
स्पेनकडून इस्रायलची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न
दरम्यान, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी इस्रायल-हमास यांच्या युद्धात इस्रायलविरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे. स्पेनने इस्रायच्या जहाजांना आपली बंदरं वापरण्यास मनाई केलेली आहे. स्पेनने इस्रायलला कच्चा माल पुरवण्यावरही बंदी घातली आहे. त्यामुळे आता इस्रायलचे सर्वच बाजूंनी नाकेबंदी होत आहे, त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
