इंशाअल्लाह बांगलादेशात परतणार, दहशतवाद्यांचे हे सरकार संपवणार…शेख हसीना यांचा मोहम्मद युनूस यांना अतिरेकी म्हणत इशारा
मी तुम्हा सर्वांना शांत आणि एकजूट राहण्याची विनंती करतो, असे शेख हसीना यांनी म्हटले. मी परत येईन आणि आमच्या शहीदांचा मृत्यूचा बदला घेईन. मी पूर्वीप्रमाणेच सर्वांना न्याय देईल. मी तुम्हाला वचन देते.

बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीन यांनी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारला दहशतवाद्यांची सरकार म्हटले आहे. बांगलादेशात झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ शेख हसीना यांनी घेतली. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बांगलादेशात झालेल्या निर्देशनात 800 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात पोलीस कर्मचारी होते. शेख हसीन यांनी झूम लिंकद्वार पाच विधवा महिला आणि त्यांच्या मुलांशी चर्चा केली. त्यात त्यांनी युनूस सरकारने बांगलादेशला दहशतवाद्यांचा अड्डा बनवल्याचे म्हटले. तसेच हे सरकार उद्ध्वस्त करुन पुन्हा बांगलादेशात परतणार असल्याचे सांगितले.
काय म्हणाल्या शेख हसीना
शेख हसीना यांनी म्हटले की, ‘युनूस यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही. त्यांनी सर्व तपास समित्या विसर्जित केल्या आहेत. त्यानंतर दहशतवाद्यांना जनतेला मारण्यासाठी कारागृहातून मोकळा सोडले आहे. ते बांगलादेश नष्ट करत आहेत. आम्ही दहशतवाद्यांचे हे सरकार पाडू. ‘इंशाअल्लाह।’




शेख हसीना पुढे म्हणाल्या, मी बंगलादेश परत येईन. आमच्या पोलिसांच्या झालेल्या हत्येचा बदला घेईल. युनिस यांनी आपल्या अंतरिम सरकारमध्ये एका विद्यार्थी नेत्याचा समावेश केला आहे. तो म्हणतो, पोलिसांना मारल्याशिवाय आंदोलन होऊ शकत नाही. परंतु विश्वास ठेवा मला ही अराजकता संपवायची आहे. पाच ऑगस्ट रोजी मी बंगालदेशातून याचसाठी बाहेर पडली. मला देशाची सेवा करायची आहे. त्या ठिकाणी सुरु असलेला दहशतवाद संपवायचा आहे. बांगलादेशातील हिंसाचारात अनेक पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले. सिराजगंजमध्ये डझनहून अधिक पोलिस अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. मी तुम्हा सर्वांना शांत आणि एकजूट राहण्याची विनंती करतो, असे शेख हसीना यांनी म्हटले. मी परत येईन आणि आमच्या शहीदांचा मृत्यूचा बदला घेईन. मी पूर्वीप्रमाणेच सर्वांना न्याय देईल. मी तुम्हाला वचन देते.
पाच ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचारातून वाचल्याचा अनुभव शेख हसीना यांनी शेअर केला. त्या म्हणाला, अल्लाहने मला दुसरे जीवन दिले आहे. मला दुसऱ्यांदा दिलेले हे जीवन जनतेच्या सेवेसाठी आहे. जे लोक बांगलादेशला दहशतवादी देश बनवत आहे, मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे, त्या सर्वांना एक दिवस कायद्यासमोर आणणार आहे.