VIDEO: भर समुद्रात जहाजाने घेतला पेट, भारतीय खलाशी अडकले

या जहाजात केमिकल आणि सौदर्यंप्रसाधनांसाठी लागणारा कच्चा माल होता | Fire in ship

VIDEO: भर समुद्रात जहाजाने घेतला पेट, भारतीय खलाशी अडकले


कोलंबो: श्रीलंकेत भर समुद्रात एका जहाजाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. हे मालवाहू जहाज गुजरातहून कोलंबोला जात होते. या जहाजात एकूण 25 खलाशी असून त्यापैकी पाचजण भारतीय आहेत. सध्या या सर्वांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

एमव्ही एक्सप्रेस पर्ल असे या जहाजाचे नाव आहे. या जहाजात केमिकल आणि सौदर्यंप्रसाधनांसाठी लागणारा कच्चा माल होता. भर समुद्रात आगीच्या ज्वालांनी (Fire in Ship) या जहाजाला संपूर्णपणे वेढल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत या जहाजातून पाच जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी दोनजण भारतीय आहेत. उर्वरित खलाशांना बाहेर काढण्यासाठी युद्दपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. (Ship travelling from Gujrat to Colombo caught fire in middle of sea)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI