Russia Perm University : रशियात विद्यापीठात गोळीबार, 8 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या टाकल्या

Perm University Attack: हल्ला झाल्याची माहिती मिळताच, विद्यार्थ्यांनी वर्गाच्या खिडक्यातून बाहेर उड्या मारणं पसंत केलं. नशीबाने इमारत जास्त उंच नसल्याने कुणाला काही झालं नाही.

Russia Perm University : रशियात विद्यापीठात गोळीबार, 8 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या टाकल्या
रशियाच्पया पर्म विद्यापीठात हल्ला, इमातरीतून विद्यार्थ्यांनी उड्या मारल्या

मॉस्को: रशियाच्या एका विद्यापीठात एका बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात अंदाजे 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मॉस्कोपासून 1300 किलोमीटरवर असणाऱ्या पर्म स्टेट यूनिव्हर्सिटीत हा गोळीबार झाला. त्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थी विद्यापीठाच्या इमारतीच्या टेरसवर तर काही विद्यापीठांच्या सभागृहात लपले. हेच नाही तर जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी इमारतीच्या खिडकीतून उड्या मारल्या. रशिया टुडे या स्थानिक माध्यम समुहाच्या माहितीनुसार या हल्ल्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 6 जण जखमी झाले आहेत. ( Shooting at Russia’s Perm State University, students jump from a university building. 8 killed )

18 वर्षांच्या माथेफिरुकडून हल्ला

रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सनकी शूटर 18 वर्षांचा तिमुर बेकमानसुरोव (Timur Bekmansurov) आहे. ज्याला सुरक्षा रक्षकांनी गोळी मारली आणि त्याचाही जागेवरच मृत्यू झाला. रशियाच्या वेळेनुसार सकाळी 11 वाजेच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला. अजून एका क्लिपमध्ये एक व्यक्ती शस्र घेऊन पर्म विद्यापीठात चालताना दिसतो आहे.

पाहा व्हिडीओ:

सुत्रांची दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हल्ला झाला, त्यानंतर लगेच सोशल मीडियावर हल्ल्याचे व्हिडीओ आले, आणि परिसरातील लोकांना लपण्यास सांगण्यात आलं. अनेकांनी हे व्हिडीओ पाहून या परिसरात जाणं टाळलं, तर विद्यापीठात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वत:ला रुममध्ये बंद करुन घेतलं.

विद्यापीठाच्या इमारतीच्या खिडकीतून विद्यार्थ्यांच्या उड्या

दरम्यान, हल्ला झाल्याची माहिती मिळताच, विद्यार्थ्यांनी वर्गाच्या खिडक्यातून बाहेर उड्या मारणं पसंत केलं. नशीबाने इमारत जास्त उंच नसल्याने कुणाला काही झालं नाही. मात्र शेकडो विद्यार्थी खिडक्यांतून इमारतीच्या बाहेर पडले. विद्यार्थी विद्यापीठाच्या इमारतीतून बाहेर पडतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडूनच हल्ला

दरम्यान, रशियन माध्यम सु्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्याने हा गोळीपार केला, तो याच विद्यापीठातील एक विद्यार्थी आहे. पोलिसांनी शूटरचा खात्मा केला आहे. विशेष गोष्ट म्हणजे, या शूटरने सोशल मीडियावर आधीच आपण काय करणार आहे, याबद्दल माहिती लिहली होती. त्यामुळे अनेकजण सतर्क झाले, तरी 8 जणांचे प्राण वाचवता आले नाही.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI