AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SpaceX : नव्या पर्वाची सुरुवात, सर्वसामान्य लोक अंतराळात, स्पेसएक्सने इतिहास रचला!

एलन मस्क यांच्या अमेरिकन एरोस्पेस कंपनी स्पेसएक्सने जगातील पहिल्या सिव्हिलियन नागरिकांच्या क्रूसह बुधवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) अंतराळात इंस्पायरेशन 4 मिशन प्रक्षेपित करुन इतिहास रचला आहे.

SpaceX : नव्या पर्वाची सुरुवात, सर्वसामान्य लोक अंतराळात, स्पेसएक्सने इतिहास रचला!
अंतराळात एक नवीन पर्व सुरु, स्पेसएक्सने इतिहास रचलाय.
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 8:04 AM
Share

नवी दिल्ली : एलन मस्क यांच्या अमेरिकन एरोस्पेस कंपनी स्पेसएक्सने जगातील पहिल्या सिव्हिलियन नागरिकांच्या क्रूसह बुधवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) अंतराळात इंस्पायरेशन 4 मिशन प्रक्षेपित करुन इतिहास रचला आहे. कंपनीने भारतीय वेळेनुसार पहाटे 5:32 वाजता 4 सर्वसामान्य लोकांना अवकाशात पाठवले आहे. हे 4 पर्यटक 3 दिवस पृथ्वीच्या कक्षेत 575 किमी वर राहतील.

हे प्रवासी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 357 मैल (575 किमी) उंचीवर प्रवास करत आहेत. फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस रिसर्च सेंटरमधून रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. ही घटना जगभरातील अंतराळ प्रवासाची आवड असलेल्या लोकांसाठी कुतूहलाचे कारण बनली आहे. हे मिशन केवळ सरकार पुरस्कृत अंतराळवीरांपेक्षा सामान्य लोकांसाठी मानवी अंतराळ उड्डाणाच्या नवीन युगाची सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे. 2009 मध्ये शास्त्रज्ञांनी 541 किमी उंचीवर टेलिस्कोप रिपेयरिंग केलं होतं.

अशी निवडली क्रू

2009 नंतर पहिल्यांदाच सर्वसामान्य माणूस इतक्या उंचीवर आहे. स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल लिफ्टऑफच्या 12 मिनिटांनंतर फाल्कन 9 रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्यापासून विभक्त झाले, त्यानंतर नागरी क्रू यशस्वीरित्या कक्षेत सोडण्यात आली आहे, असं एरोस्पेस कंपनीने कळवलं. मिशनला 38 वर्षीय अब्जाधीश आणि परोपकारी जेरेड इसाकमन यांनी निधी दिला आहे. जे शिफ्ट 4 पेमेंट्स इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते स्पेसफ्लाइटचे मिशन कमांडर देखील आहेत, ज्यांनी स्पर्धेद्वारे उर्वरित क्रूची वैयक्तिकरित्या निवड केली.

कॅन्सर सर्वायव्हर मिशनमध्ये सहभागी

या मिशनचा उद्देश अमेरिकेतील सेंट जूड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटलसाठी निधी गोळा करणे आहे. मिशनचे नेतृत्व करणाऱ्या इसकमनच्याद्वारे $ 200 दशलक्ष जमा करायचे आहेत, त्यातील अर्धा ते स्वतः देतील. मिशनच्या निधीतून कर्करोगाविरुद्ध जनजागृती मोहीमही चालवली जाईल. मिशनचा एक सदस्य कर्करोगापासून वाचलेला देखील आहे. पृथ्वीच्या कक्षेत जाणारी ही बिगर व्यावसायिक अंतराळवीरांची पहिली टीम आहे.

(spacex launches 4 Amateurs on Private earth Circulating trip)

हे ही वाचा :

पाकिस्तानचा डबल गेम त्याच्याच अंगाशी येणार, अमेरिका कडक पावलं उचलण्याची शक्यता, पाक संबंधांवर पुन्हा विचार!

तालिबान सरकारमध्ये फूट, नाराज मुल्ला अब्दुल गनी बरादर कित्येक दिवसांपासून गायब

चीनच्या फुजियान प्रांतात डेल्टा वेरिएंटचा कहर, संपूर्ण शहर सील, चित्रपटगृह, शाळा, हायवे सगळं बंद

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.