AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ्या रंगाच्या मर्सिडिझ बेंझच्या या मॉडेलचं वैशिष्ट्य वाचलं का? महाराणी एलिझाबेथशी याचं कनेक्शन काय?

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ताबूत रविवारी स्कॉटलँडमध्ये आणलं गेलं. हे आणण्यासाठी एक काळ्या रंगाची मर्सिडिझ ई क्लास कार वापरली गेली. विशेष म्हणजे ही कार खास यासाठीच तयार करण्यात आली आहे.

काळ्या रंगाच्या मर्सिडिझ बेंझच्या या मॉडेलचं वैशिष्ट्य वाचलं का? महाराणी एलिझाबेथशी याचं कनेक्शन काय?
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 9:59 AM
Share

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth) यांचे ताबूत एका शहरातून दुसऱ्या शहरात वाहून नेण्यासाठी खास कारचा वापर करण्यात आला. कोचबिल्डर बेंझने हे मॉडेल तयार केलंय.  मर्सिडिझ बेंझ (Mercedes Benz ) ई क्लास असं हे  खास मॉडेल (Special Model) आहे. ही पाच दरवाजे असलेली कार आहे. महाराणी एलिझाबेथ यांचं शव स्कॉटलँडच्या बाल्मोरल येथून एडिनबर्गमध्ये नुकतंच आणलं गेलं. ब्रिटनमधील रिपोर्टनुसार, ताबूत नेण्यासाठी वापरलेली मर्सिडिझ ई क्लासची ही कार Binz H4 वर आधारीत आहे. शाही घराण्यातील स्कॉटिश व्हर्जननुसार, या मौसमात तिथे मिळणाऱ्या फुलांमध्ये महाराणीचे ताबूत सजवलेले आहे. मर्सिडिजच्या मागील बाजूस ओक कास्केटमध्ये ते ठेवण्यात आलं होतं. या कारची आणखी काय वैशिष्ट्य आहेत, हे समजून घेऊयात-

  1. महाराणी एलिझाबेथ यांचं ताबूत नेण्यासाठी जर्मनीतील Binz International कंपनीने Mercedes-Benz E Class हे मॉडेल तयार केलं आहे.
  2.  Mercedes-Benz E Class या मॉडेलमध्ये जास्त लांब व्हीलबेस आणि रिअर डेस्क येते.
  3.  मर्सिडिज ई क्लासची एकूण लांबी 5,999 मिमी आहे. S212E च्या तुलनेत ती 1,104 मिमी ने जास्त लांब आहे.
  4.  तसेच कारमध्ये 2,800 मिमी कास्केट डेकची जागा मिळते.
  5.  मागील बाजूला 750 मिमी उंच विंडो आहे. तर कारची एकूण उंची 1,920 एवढी आहे.
  6. ही कार फॅक्टरी व्हॅगनच्या तुलनेत 446 मिमी उंच आहे.
  7. ही कार मॉडिफाय करणारी Binz कंपनी ही मर्सिडिज बेंझसोबत 1950 पासून कार्यरत आहे.
  8. बिंझने मर्सिडिज बेंजसोबत प्रत्यक्ष काम सुरु केलं आणि W120 Ponton सेडानचं अँब्युलन्स व्हर्जन तयार केलं.
  9. Binz ही एक प्रसिद्ध कोचबिल्डर आहे. ही कंपनी अँब्युलन्स बनवणे, शवपेटी घेऊन जाणारी घोडा गाडी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.
  10.  बिंझने एअरमॅटिक एअर सस्पेंशन कायम ठेवले आहे. ही कार 2.0 लीटर टर्बो डिझेल इंजिनची असते. किंवा E300e पेट्रोल इलेक्ट्रिक प्लग इन हायब्रिड अशा स्वरुपात उपलब्ध आहे.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.