AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेत आंदोलकांची थेट राष्ट्राध्यक्षांच्याच घरावर धडक; घरात मिळाले 38 लाख रुपये; सर्व रक्कम लष्कराकडे सुपूर्द

श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती भयानकतेच्या पार गेली आहे. नागरिकांनी रागाच्या भरात पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या मालकीच्या घराला आग लावली आहे. त्यामुळे याप्रकरमी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरकीकडे आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रपती निवासस्थानातून बाहेर पडण्यास नकार दिला आहे.

श्रीलंकेत आंदोलकांची थेट राष्ट्राध्यक्षांच्याच घरावर धडक; घरात मिळाले 38 लाख रुपये; सर्व रक्कम लष्कराकडे सुपूर्द
श्रीलंकेप्रमाणे 9 देश अराजकाच्या दिशेने
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jul 10, 2022 | 6:57 PM
Share

नवी दिल्लीः गेल्या दोन तीन महिन्यांपासून श्रीलंकेत (Sri lanka) प्रचंड मोठा राजकीय आणि आर्थिक गोंधळ सुरू आहे. काल मात्र त्याच रोषातून आंदोलकांनी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर धडक मारली, यावेळी आंदोलकांना येथे राष्ट्राध्यक्षांच्या घरामध्ये सुमारे 39 लाख रुपये (1.78 कोटी श्रीलंकन ​​रुपये) (1.78 crore Sri Lankan) रोख सापडले असल्याचे वृत्त देण्यात आले आहे. मात्र आंदोलकांना मिळालेली ही संपूर्ण रक्कम त्यांनी लष्कराकडे सुपूर्द केली आहे. एकीकडे राष्ट्राध्यक्षांच्या बंगल्यावर धडक (Strike on the President’s bungalow) मारून मोठी रक्कम मिळूनही ती रक्कम लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली, तर दुसरीकडे मात्र राष्ट्रपती भवन ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक त्या ठिकाणी मौजमजा करताना दिसत आहेत.

काही लोक राष्ट्रपतींच्या स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारत आहेत, तर काही जण राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसून फोटो काढत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. काही लोक रॉयल किचनमध्ये जेवण करत आहेत, तर काही राष्ट्रपतींच्या बेडरूममध्ये आराम करत आहेत.

भारताचा पुन्हा एकदा श्रीलंकेला मदतीचा हात

श्रीलंकेत ही परिस्थिती चालू असतानाच भारताने मात्र भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी सांगितले की,केंद्र सरकारने श्रीलंकेला मदत करण्यासाठी 44 हजार मेट्रिक टन युरिया पाठवण्यात आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर याचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

श्रीलंकेच्या संकटावर काँग्रेसचे निवेदन

श्रीलंकेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही चिंता व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांनी सांगितले आहे की, प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंचा अभाव त्यामुळे श्रीलंकेत मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की भारत सरकार श्रीलंकेला मदत करत राहील. काँग्रेस पक्षही या संकटकाळात श्रीलंकेतील जनतेच्या पाठीशी उभा असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

निर्वासितांचे कोणतेही संकट नाही

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारत सरकारकडून श्रीलंकेला नेहमीच पाठिंबा देण्यात येत आहे. अलीकडच्या काळात जे संकट आले आहे त्यातही सर्वतोपरी मदत केली जात आहे. श्रीलंकेच्या बाजूने सध्या भारतात निर्वासितांचे कोणतेही संकट नसल्याचे भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांच्या घराला आग लावणाऱ्या तिघाना अटक

श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती भयानकतेच्या पार गेली आहे. नागरिकांनी रागाच्या भरात पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या मालकीच्या घराला आग लावली आहे. त्यामुळे याप्रकरमी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरकीकडे आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रपती निवासस्थानातून बाहेर पडण्यास नकार दिला आहे.

Follow Us
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?