पाकिस्तान नीच गिरीवर उतरला, इस्लामाबादमध्ये भारतीय डिप्लोमॅट्सच पाणी रोखलं, अजून काय-काय?
पाकिस्तानने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भारतीय डिप्लोमॅट्सना भरपूर त्रास दिला जातोय. कालच अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे जिहादी मानसिकतेचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी तिथून भारताला अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली.

अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे जिहादी मानसिकतेचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी तिथून भारताला अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली. धरण बांधलं तर ते मिसाइल डागून फोडून टाकू असा इशारा दिला. त्यानंतर आता ISI ने पाकिस्तानात तैनात असलेल्या भारतीय उच्च आयोगातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. हाय कमिशनमधील भारतीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधा नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकारमधील उच्च पदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व जाणीवपूर्वक सुरु आहे. वियना कन्वेंशनच हे उल्लंघन आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये नव्या वादाची सुरुवात झाली आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने मिळवलेला विजय आणि सिंधू जल कराराला दिलेली स्थगिती यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. त्यातूनच पाकिस्तानकडून हे नको ते प्रकार सुरु आहेत. छोटासा प्रतिकार असा याचं स्वरुप आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI च्या डोक्याने हे सर्व सुरु आहे. पाकिस्तानातील उच्चायोगातील भारतीय कर्मचाऱ्यांची दैनंदिन व्यवस्था बिघडवायची, चांगल्या वातावरणात त्यांना काम करु द्यायचं नाही. त्यासाठी हे सर्व सुरु आहे असं सरकारी सूत्रांनी सीएनएन न्यूज 18 ला सांगितलं.
कसा त्रास दिला जातोय?
भारतीय उच्च आयोगाच्या परिसरात सुई नॉर्थन गॅस पाइपलाइन लिमिटेडने गॅस पाइपलाइनने टाकली आहे. पण पुरवठा जाणीवपूर्वक रोखण्यात आला आहे. स्थानिक गॅस सिलेंडर विक्रेता जो आधी हाय कमिशनमध्ये सिलेंडर पोहोचवायचा. त्याला सांगितलय की, भारतीय हाय कमिशनला सिलिंडर विक्री करायची नाही. त्यामुळे भारतीय डिप्लोमॅट्सना ओपन मार्केटमध्ये महागडे पर्याय शोधावे लागत आहेत.
वियना कन्वेंशन काय आहे?
हा त्रास फक्त इंधनापुरताच नाही, तर भारताला स्वच्छ पिण्याच पाणी मिळू नये यासाठी सुद्धा कंबर कसली आहे. भारतीय हाय कमिशनला पाणी विकू नका, असं पाणी पुरवठा विक्रेत्यांना सांगण्यात आलय. त्यामुळे भारतीय अधिकारी-कर्मचारी वर्ग त्रस्त आहे. स्थानिक नळाद्वारे येणारं पाणी सुरक्षित नाहीय. वियना कन्वेंशननुसार दूतावासाचा कारभार सुरळीत, सुरक्षित आणि आदर राखून झाला पाहिजे. पाकिस्तानकडून जे सुरु आहे ते वियना कराराच उल्लंघन आहे. थेट चर्चेऐवजी त्रास देण्यासाठी अपारंपारिक पद्धती वापरल्या जात आहेत.
