मोठी बातमी! पाणबुड्या, नौदल, लढाऊ विमानं तयार, आता डोनाल्ड ट्रम्प या देशावर करणार हल्ला, जगभरात खळबळ
इस्रायल, इराण युद्धानंतर आता पुन्हा एकदा जगात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे जगात खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.

अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संघर्ष आता धोकादायक वळणावर पोहोचला आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. आता जर व्हेनेझुएलाच्या लढाऊ विमानांनी अमेरिकन नौदलाच्या जहाजांवरून उड्डान केलं, आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण केला तर अशी सर्व विमानं आम्ही पाडून टाकू असा थेट इशाराच आता ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला दिला आहे.
अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हेनेझुएलाने सलग दोन दिवस दक्षिण अमेरिकेच्या जवळ असलेल्या अमेरिकन नौदलाच्या जहाजापासून खूपच जवळ अंतरावरून आपली लढाऊ विमानं उडवली आहेत, यावरून आता डोनाल्ड ट्रम्प यांचा चांगलाच संताप झाला आहे. त्यांनी व्हेनेझुएलाला थेट इशारा दिला आहे, ट्रम्प प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकन मीडियानं केलेल्या दाव्यानुसार तणाव आणखी वाढल्यास अमेरिका 10 एफ-35 स्टेल्थ लढावू विमानं पाठवण्याच्या तयारीमध्ये आहे.
अमेरिकेकडून सर्जिकल स्ट्राइकचा विचार
अमेरिकन मिडिया रिपोर्टनुसार अमेरिका आता व्हेनेझुएलामध्ये असलेल्या ड्रग कार्टेल्सवर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहेत. या ड्रग कार्टेल्सला यापूर्वीच अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार आता अमेरिकेकडून व्हेनेझुएलामध्ये असलेल्या अशा ड्रग कार्टेल्सवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची तयारी सुरू आहे, अमेरिकेनं आता व्हेनेझुएलाच्या समुद्री सीमेपासून अवघ्या काही अंतरावरच युद्धनौका, नौदल आणि अणु ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या तैनात केल्या आहेत, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
व्हेनेझुएलाचा अमेरिकेला इशारा
दरम्यान दुसरीकडे अमेरिकेनं केलेल्या एका कारवाईमध्ये व्हेनेझुएलाचे आकरा नागरिक मारले गेले आहेत, या घटनेनंतर आता व्हेनेझुएलाकडून देखील अमेरिकेला इशारा देण्यात आला आहे, तसेच अमेरिकेकडून करण्यात आलेले सर्व आरोप देखील फेटाळून लावण्यात आले आहेत. दरम्यान दोन्ही देशांकडून एकमेकांना इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता असून, अमेरिकेनं जर व्हेनेझुएलावर सर्जिक स्ट्राईक केला तर पुन्हा एकदा यद्धाचा भडका उडू शकतो.
