Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीरियातील बंडाळीनंतर असद यांच्या राष्ट्रपती भवनात घुसली जनता, जे सापडेल ते उचलून नेले

आतीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी सीरियाची अवस्था झालेली आहे. सीरियातील सरकारला अनिच्छेने आंतरराष्ट्रीय समुदायाने पाठींबा दिला होता. आता तेथे आणखीनच बेदिली माजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण बंडखोरांनी सरकार पाडले पण पुढे काय करणार हे स्पष्ट झालेले नाही.

सीरियातील बंडाळीनंतर असद यांच्या राष्ट्रपती भवनात घुसली जनता, जे सापडेल ते उचलून नेले
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 7:06 PM

बांग्लादेशात सत्तापलट झाल्यानंतर शेख हसीना यांच्या घरात जसे लोक घुसले होते. तसाच प्रकार सीरियात घडला आहे. एका आठवडाभराच्या संघर्षानंतर अखेर रविवारी सीरियाची राजधानी दमिश्कवर ताबा मिळविल्याचा दावा बंडखोरांनी केल्यानंतर अफरातफरी माजली आहे. सरकारी सैन्यांकडून बंडखोरांना कोणताही विरोध न झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद देश सोडून पळून गेले आहेत. त्यानंतर सीरियातील लोक दमिश्क येथील राष्ट्रपती भवनात घुसले आणि त्यांनी असद महलमधून जे मिळेल ते लुटून नेले आहे.

राष्ट्राध्यक्ष असद यांच्या महालासारख्या घरातील सामान लुटून नेल्याचा व्हिडीओ समोर आहे. यात मोठा जनसमुदाय राष्ट्रपती भवनात घुसलेला दिसत आहे. आणि तेथून कपडे देखील चोरुने नेताना दिसत आहे. या मोठ्या संख्येने महिला देखील दिसत आहेत. या व्हिडीओने शेजारील बांग्लादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या स्मृती जागृत झाल्या आहेत.

असद यांचे पुतळे पाडले

असद यांच्या सरकारचा अंत झाल्याचे आणि सर्व कैद्यांना मुक्त केल्याचे सरकारी दूरचित्रवाणीवरुन जाहीर करण्यात आले आहे. राजधानी दमिश्कच्या रस्त्यावर आणि चौकात लोक जल्लोष करताना दिसत आहेत.जोपर्यंत सत्ता परिवर्तन होत नाही.तोपर्यंत देशाचे सरकार पंतप्रधान चालवतील असे सीरियातील विरोधी पक्षाच्या सैन्य मोहीम प्रशासनाने म्हटले आहे. संपूर्ण सीरियातील राष्ट्राध्यक्ष बशर अल- असद यांचे पुतळे तोडले जात आहेत आणि बंडखोर गट हवेत गोळीबार करीत जल्लोष साजरा करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

सीरियातील बशर अल- असद यांच्या नेतृत्वाखालील सरकार सीरियात साल २०११ पासून सुरु झालेल्या गुहयुद्धाच्या केंद्र स्थानी राहीली आहे. अल-असद साल २००० मध्ये सत्तेवर आले होते. साल १९७० मध्ये सत्तापालट झाल्यानंतर सीरियावर ज्यांनी सत्ता गाजवली होती त्या कुटुंबातील वारस म्हणून बशर अल- असद यांना पाहीले जात होते. ते अलावाईट्स होते, जी शिया इस्लामची एक शाखा आहे.अलावाईट्स सीरियात अल्पसंख्यांक आहेत. बशर अल-असद यांनी सुरुवातीला स्वत:ला सुधारणावादी नेते म्हणून पुढे आणले होते. परंतू अरब स्प्रिंग दरम्यान त्यांनी त्यांच्या सरकारविरोधात शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर क्रूर कारवाई केली होती. त्यामुळे देशभर असंतोष परसला होता.

बंडखोरांना सत्तापालट केला पण पुढे काय?

बशर अल-असद यांना सत्तेतून हटविणे हेच आमचे पहिले लक्ष्य असल्याचे बंडखोरांचे म्हणणे आहे. परंतू आता पुढे काय होणार आहे हे स्पष्ट झालेले नाही.आंतरराष्ट्रीय समुदायाने अनिच्छेने का होईना परंतू त्यांना नेते म्हणून समर्थन जारी केले होते.आता बंडखोरांच्या उठावाने आधीच अस्थिर असलेल्या या क्षेत्रात आणखीनच अनिश्चितेचे सावट पसरले आहे.

'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....