AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेकडून मोठा छळ, ट्रम्प काढत आहेत विद्यार्थ्यांवर राग, धक्कादायक आकडेवारी..

डोनाल्ड ट्रम्प भारतीय लोकांच्या समस्या वाढवत आहेत. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा थयथयाट बघायला मिळत आहे. अमेरिकन लोकांना प्रोत्साहन देण्याचे सांगत ते धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत.

भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेकडून मोठा छळ, ट्रम्प काढत आहेत विद्यार्थ्यांवर राग, धक्कादायक आकडेवारी..
USA Indian Student Visa
| Updated on: Oct 08, 2025 | 10:44 AM
Share

अमेरिकी सरकारने मोठा निर्णय घेत H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला. आता H-1B व्हिसा मिळवण्यासाठी तब्बल 88 लाख रूपये शुल्क भरावे लागणार आहे. यासोबतच भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठीही अमेरिकेत जातात. आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अमेरिकत भारतीय विद्यार्थ्यांनी जाण्याची संख्या कमी झालीये. भारतीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या व्हिसामध्ये मोठी घट झालयाचे आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. आकडेवारीनुसार, भारतीय विद्यार्थ्यांना जारी करण्यात आलेल्या व्हिसाची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप जास्त कमी आहे. 50 टक्के भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा कमी देण्यात आलीत, गेल्या वर्षीच्या तुलनेत.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात व्हिसामध्ये मोठी घट 

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारत-अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध तणावात आहेत. भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. आता विद्यार्थ्यांना देखील अमेरिका सोडत नाहीये. भारतीय विद्यार्थ्यांना अगोदरच्या तुलनेत अमेरिकेचे व्हिसा मिळत नाहीत. यामुळे इच्छा असूनही विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकत नाहीत. भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसाच्या संख्येत मोठी घट अमेरिकेने केली आहे.

भारतीय विद्यार्थ्यांचे होत आहे मोठे नुकसान 

जुलै महिन्यात 24,298 वरून संख्या 13,027 वर आली. ऑगस्टमध्ये 74,825 वरून 41,540 वर आली. ऑगस्ट 2025 मध्ये एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे आगमन अंदाजे 3,13,138 होते, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 19 टक्के कमी आहे. दुसरीकडे चीनच्या विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने व्हिसा देण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. H-1B व्हिसाच्या नियमातील बदलानंतर आता अमेरिका विद्यार्थी व्हिसावरूनही मोठे राजकारण करताना दिसत आहे.

H-1B व्हिसा धारकांनंतर भारतीय विद्यार्थ्यांना मोठा धक्का 

हेच नाही तर अमेरिकेतील विद्यापीठांनी H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांनी सध्या अमेरिका न सोडण्याचे आदेश दिली आहेत. भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने विविध विषयांचे अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतात. मात्र, यंदा अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्यांना खूप कमी प्रमाणात अमेरिकेचा व्हिसा दिला आहे. यावरूनही भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक तणावात येण्याचे संकेत आहेत. आता भारतीय विद्यार्थी अमेरिकेशिवाय इतर देशांकडे वळताना दिसत आहेत.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.