पुढील 24-48 तास धोक्याची, भारताची धाकधुक वाढली, थेट 15 जहाजे..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग संकटात आहे. होर्मुज खाडीत तणाव वाढत आहे. अमेरिकेने नाकेबंदी इराण खाडीत केल्याने स्थिती वेगळी झाली. त्यामध्येच आता होर्मुज खाडीतून अत्यंत मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे.

पुढील 24-48 तास धोक्याची, भारताची धाकधुक वाढली, थेट 15 जहाजे..
Strait of Hormuz
| Updated on: Apr 16, 2026 | 1:35 PM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्लामाबाद येथे झालेल्या युद्धबंदी कराराच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने थेट होर्मुज खाडीत नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला. होर्मुज खाडीत अमेरिकेने नाकेबंदी केली. अमेरिकेच्या या नाकेबंदीमुळे स्थिती गंभीर आहे. इराणचे एकही जहाज बंदरातून बाहेर पडू शकत नाही. अमेरिकेचे हवाई दल आपल्या अत्याधुनिक निगराणी प्रणालीसह संपूर्ण मार्ग बंद करण्याचे काम करत आहे. होर्मुज खाडीत स्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच दावा करत म्हटले होते की, होर्मुज खाडीत शुल्क आकारण्याचा अधिकार इराणचा नाही तर आमचा आहे. अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. जे मित्र देश आहेत, त्यांचे जहाज मध्ये मध्ये सोडली जात होती. पण होर्मुज खाडीचा वापर करण्याकरिता इराणकडून शुल्क लावण्यात आले. या शुल्काचा पैशांचा वापर युद्धात करणार असल्याचे इराणकडून स्पष्ट करण्यात आले.

होर्मुज खाडी महत्वाची असल्याने अनेक देशांनी इराणला पैसे देत आपली जहाज होर्मुजमधून काढली. भारतासाठीही होर्मुज खाडी अत्यंत महत्वाची आहे. भारतात एलपीजी गॅस आणि कच्चे तेल याच मार्गे येते. अमेरिकेने इराणी बंदरांमधून होणाऱ्या प्रवासावर निर्बंध लादले असले तरी इराणने या खाडीत सागरी सुरुंग पेरली आहेत. त्यामुळे अमेरिका काहीही करू शकत नाही.

अमेरिकेने केलेली नाकेबंदी ही फक्त इराणच्या जहाजांकरिता आहे, इतर देशांच्या नाही. मात्र, इराणच्या परवानगीशिवाय एकही जहाज होर्मुज खाडी पार करू शकत नाही. होर्मुज खाडीत भारताचे अजूनही 15 जहाज अडकले आहेत. पुढील पुढील 24-48 तास धोक्याची आहेत, होर्मुज खाडीत मोठ्या घडामोडी घडण्याचा अंदाज आहे. इराणसोबत भारत असा जास्त व्यापार करत नाही, यामुळे इराणच्या बंदरातून जहाजे बाहेर निघू शकत नसल्याचा परिणाम भारतावर होणार नाही.

परवा दिवशी भारताचे एक जहाज ज्यात एलपीजी गॅस होता, त्या जहाजाने सुरक्षित होर्मुज खाडी पार केली. कोणत्याही स्थितीमध्ये लवकरात लवकर होर्मुज खाडी सुरक्षित व्हावी, ही जगाची मागणी आहे. अमेरिकेने होर्मुज खाडीत केलेल्या नाकेबंदीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर थेटपणे परिणाम होताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us