AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक थेंबही पाणी देणार नाही.. कोर्टात भारताला मोठा दणका, पाकिस्तानचा विजय, थेट भडकून..

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. भारताने थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची वाट लावली. यादरम्यानच जल सिंधु करार चर्चेत आहेत. भारताने पाकिस्तानला चारही बाजूने घेरले. यादरम्यानच न्यायालयाच्या निकालावर भारताने थेट जाहीर भूमिका घेतली.

एक थेंबही पाणी देणार नाही.. कोर्टात भारताला मोठा दणका, पाकिस्तानचा विजय, थेट भडकून..
Indus Waters Treaty
| Updated on: May 17, 2026 | 8:27 AM
Share

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावात आहेत. त्यामध्येच पहलगामवरील हल्ल्यानंतर हे संबंध अधिकच तणावात आली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधु जल करार यामुळे संबंध अधिकच तणावात आहेत. भारताने शनिवारी कथित या प्रकरणातील मध्यस्थी न्यायालयाने 16 मे रोजी दिलेल्या आदेशाला पूर्णपणे फेटाळून लावले. भारताने स्पष्ट केले की, चुकीच्या पद्धतीने संघटन केलेल्या या न्यायालयाच्या आदेशाला आम्ही मानत नाहीत. सिंधु जल करारावरील स्थगिती कोणत्याही प्रकरणात काढणार नाहीत. न्यायालयाने भारताला दणका देत पाकिस्तानच्या बाजूने निकाल दिला. मात्र, भारताने स्पष्ट केले की, आम्हाला हा निकालच मान्य नाही. आम्ही जल सिंधु करारावरील स्थगिती कायम ठेवणार आहोत. पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाहीत.

विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जैसवाल याबाबत बोलताना म्हणाले की, बेकायदेशीर पणे तयार केलेल्या मध्यस्थी न्यायालयाने 16 मे रोजी जल ग्रहणबाबत निकाल दिला. मात्र, हा निकाल सिंधु जल संधी करारातील व्याख्यांच्या मुद्द्यावर योग्य नाही. भारत या निकालाला फेटाळून लावतो. न्यायालयाच्या या निर्णयानंतर भारत कोणतीही पाऊले उचलणार नाही. स्थगिती कायम राहणार आहे.

कारण न्यायालयाची मध्यस्थताच बेकायदेशीर आहे. भारताने हा निकाल आपल्याला मान्य नसल्याने स्पष्ट सांगितले आहे. भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केल्याने मोठी खळबळ पाकिस्तानमध्ये उडाली आहे. शेतींचे मोठे नुकसान यासोबतच पाकिस्तानमध्ये पिण्याच्या पाण्याचेही मोठे वांदे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतावर दबाव टाकण्याचे काम पाकिस्तान करत आहे. यासोबतच भारताला गंभीर परिणामांना सामोरे जाण्याच्या धमक्या देखील दिल्या जात आहेत.

न्यायालयाच्या निकालानंतरही भारताने आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे. भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये झुकणार नाही. न्यायालयाची मध्यस्थीच बेकायदेशीर असल्याचे भारताने म्हटले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठे पाऊस उचलली आहेत. त्यामध्येच जल सिंधु कराराला स्थगितीही दिली. जल सिंधु करारावरील स्थिगिती उठवण्याकरिता पाकिस्तान प्रयत्न करत आहे. भारतावर दबाव आणण्याचे काम पाकिस्तानकडून केले जात आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप