अर्थव्यवस्थेची पार वाट लागली, नॅशनल पॉवर ग्रिडही फेल; ‘हा’ संपूर्ण देशच गेला अंधारात

संपूर्ण देशात काळोख पसरला. या काळोखावरुन त्या देशातील परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.

अर्थव्यवस्थेची पार वाट लागली, नॅशनल पॉवर ग्रिडही फेल; 'हा' संपूर्ण देशच गेला अंधारात
बांगलादेशात काळोखImage Credit source: social
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 7:35 PM

नवी दिल्ली :  बांगलादेशात (Bangladesh) आज पूर्णपणे काळोख पसरला. अर्थव्यवस्थेचं संकट असताना हा पसरलेला काळोख देखील तुम्हाला या देशातील संपूर्ण परिस्थितीचा थोडक्यात अंदाजा देऊ शकतो. या देशात सर्वकाही बिघडलेलं आहे. नॅशनल पॉवर ग्रीडमध्ये (power grid) बिघाड झाल्यामुळे हा काळोख झालाय. बांगलादेश सरकारने डिझेलवर चालणारे सर्व वीज प्रकल्प बंद केले आहेत.

नॅशनल पॉवर ग्रिडही फेल

बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशाच्या पूर्वेकडील भागात कुठेतरी वीज ट्रान्समिशनमध्ये बिघाड झाला आहे. विद्युत विभागाचे प्रवक्ते शमीम हसन यांनी सांगितले की राजधानी ढाका आणि इतर प्रमुख शहरांमधील सर्व वीज प्रकल्प बंद करण्यात आले आणि वीज खंडित करण्यात आली.

बांगलादेश सरकारने डिझेलवर चालणारे सर्व वीज प्रकल्प बंद केले आहेत. डिझेलवर चालणारे पॉवर प्लांट बांगलादेशातील सुमारे 6 टक्के वीजनिर्मिती करतात, त्यामुळे त्यांच्या बंदमुळे उत्पादन 1500 मेगावॅटपर्यंत कमी होऊ शकते.

गारमेंट क्षेत्रातील लोक याबद्दल खूप चिंतेत आहेत. अलीकडेच बांगलादेश गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स अँड एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष फारुख हसंका यांनी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले होते. कापड कारखाने आता दिवसाचे 4 ते 10 तास वीजविना असतात.

देशातील अशी बिघडलेली परिस्थिती

बांगलादेशच्या बिघडलेल्या स्थितीचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयातीतील वाढ आणि निर्यातीचे प्रमाण. येथील सेंट्रल बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार, जुलै 2021 ते मे 2022 दरम्यान, 81.5 अब्ज डॉलरची आयात करण्यात आली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत आयातीत 39 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, बांगलादेशने इतर देशांकडून माल मागवण्यासाठी अधिक पैसे खर्च केले आणि आपल्या मालाची निर्यात कमी केली. या प्रकारात त्यांचेही नुकसान झाले.

सर्वात मोठा कापड निर्यातदार

बांग्लादेश हा चीननंतर जगातील दुसरा सर्वात मोठा वस्त्र निर्यातदार देश आहे आणि गारमेंट उत्पादनांच्या निर्यातीतून दरवर्षी एकूण परकीय चलनापैकी 80 टक्क्यांहून अधिक कमाई करतो.

आशियाई विकास बँकेच्या अहवालात असे म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात बांगलादेशची आर्थिक वाढ 7.1 टक्क्यांच्या आधीच्या अंदाजापेक्षा कमी होऊन 6.6 टक्क्यांवर जाईल. अहवालात मंदीचे कारण कमकुवत निर्यात मागणी, देशांतर्गत उत्पादन असे नमूद करण्यात आले आहे.

शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात.
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'.
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ.
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.