AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडे किती आहे सोने, कोणत्या देशांकडे भारतापेक्षा जास्त सोने? भारत या क्रमांकावर, इतके टन..

जागतिक बाजारात सोन्याला खूप जास्त महत्व आहे. सरकारकडून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. आरबीआयकडे मोठ्या प्रमाणात सोने आहे. भारत ही सोन्यासाठी अत्यंत मोठी सराफा बाजारपेठ आहे. मोठ्या प्रमाणात भारतात सोन्याची आयात केली जाते.

भारताकडे किती आहे सोने, कोणत्या देशांकडे भारतापेक्षा जास्त सोने? भारत या क्रमांकावर, इतके टन..
Gold in India
| Updated on: Apr 29, 2026 | 2:08 PM
Share

सोन्याची मोठी बाजारपेठ भारतात आहे. भारतात मोठ्या संख्येने सोने आयात केले जाते. सोन्याचा भाव काहीही असो भारतीय बाजारपेठेत सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. सर्व सोने बाहेरून येते. काही दिवसांपूर्वीच आपण बातमी ऐकली असेल की, युद्धाच्या स्थितीमध्ये रशियाने आपल्याकडे असलेले सोने जागतिक बाजारात विकले. प्रत्येक देशाकडे त्याचे स्वतंत्र सोने असते. सोने अनेक वर्षांपासून ग्लोबल फायनेंशियन महत्वाचा भाग राहिले आहे. ज्यामुळे अनिश्चिततेपासून वाचता येते आणि संपत्तीच्या स्वरूपात त्याला बघितले जाते. मुळात म्हणजे भारतातील प्रत्येक घरात सोने महत्वाचा हिस्सा आहे. आपल्या उत्पादनातून थोडे थोडे पैसे बाजूला काढून सोने खरेदी केले जाते. सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे भाव कमी झाले. अनेकांनी यादरम्यान सोन्याची खरेदी केली.

तुम्हाला माहिती आहे का? भारताकडे नक्की किती सोने आहे? याबाबत बीबीसी न्यूजने इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादचे इंडिया गोल्ड पॉलिसी सेंटरचे प्रमुख प्रोफेसर सुंदरावल्ली नारायण स्वामी यांना विचारले. यावर उत्तर देत त्यांनी म्हटले की, याबाबत वेगवेगळे आकडे आहेत. शेवटी सर्वकाही अंदाज अनुमानानुसार आरबीआयच्या जवळ 800-820 टन सोने आहे. आर्थिक स्थितीत काढले जाऊ शकणारे सोने 70 ते 80 टन आहे.

पण भारताकडे चांगल्या गुणवत्तेचे सोने तसे कमी आहे. कारण भारतात सोने उत्पादन होत नाही. हेच नाही तर भारतीय घरांमध्येही खूप जास्त मोठ्या प्रमाणात सोने आहे. 25 हजार ते 27 हजार टनच्या पुढे हे सोने आहे. मुळात म्हणजे भारतात दरवषी 600 ते 700 टन सोने आयात होते. पण भारतातून फार कमी म्हणजे नाहीच्या बरोबरीने सोने बाहेर जाते.

वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या रिपोर्टनुसार, फेब्रुवारी 2026 पर्यंत भारतात जवळपास 880 टन सोन्याची नोंद झाली. जर कोणी देश जास्त प्रमाणात सोने निर्यात करत असेल तर त्याची मुद्रा मजबूत होते. भारत हा सर्वात जास्त सोने आयात करणारा देश आहे. त्यामुळे जर सोन्याच्या किमती वाढत असतील तर त्याचा थेट परिणाम रूपयांवर होतो. सोनेच्या मुद्द्यात भारत 9 व्या क्रमांकावर आहे. भारताच्या पुढे अमेरिका, जर्मनी, आयएमएफ, इटली, फ्रान्स, रशिया, चीन, स्विट्सलॅंड आहेत, त्यानंतर भारताचा नंबर आहे.

Follow Us
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला
चक्क 'अरे सोड रे...' म्हणत राऊतांनी पत्रकाराचा 'तो' प्रश्न धुडकावला.
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख....
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठा उलटफेर, अश्विनी देशमुख.....
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे.....
ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी पॅरामिलिटरी फोर्स म्हणत राऊतांचे......
राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंत
राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंत.
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात
मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात.